घरदेश-विदेशCorona Restrictions: जर्मनीने भारत, ब्रिटनसह अनेक देशांवरील प्रवास निर्बंध उठवले

Corona Restrictions: जर्मनीने भारत, ब्रिटनसह अनेक देशांवरील प्रवास निर्बंध उठवले

Subscribe

जर्मनीने भारसतासह, ब्रिटन, पोर्तुगाल देशातील विमान प्रवासावरील निर्बंध हटविल्याची घोषणा केली आहे. भारतासह इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता ही विमान प्रवास बंदी घालण्यात आली होती. मात्र ही प्रवास बंदी हटवल्याची घोषणा मंगळवारी जर्मनीने केली आहे. गेल्या दिवसांपासून भारत, ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. दरम्यान ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाबाधित रुग्णांची सतत वाढ होत होती तर भारतातील रुग्णसंख्या दररोज ४० हजार कोरोना बाधितांची नोंद केली जात होती. याचपार्श्वभूमीवर बर्‍याच देशांनी परदेशी प्रवासावर निर्बंध घातले आहेत. या क्रमवारीत जर्मनीने सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या १६ देशांवर प्रवासी निर्बंध देखील घातले होते.

मात्र जर्मनीच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने सोमवारी रात्री उशीरा जाहीर केले की, ब्रिटेन, पोर्तुगाल, रशिया, भारत आणि नेपाळ यांना बुधवारी कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या देशांच्या यादीतून काढून टाकले जाईल. तसेच या देशांमधील चिंताजनक व्हेरियंटचा समावेश दुसर्‍या क्रमांकाच्या यादीत केला जाईल. यामुळे भारतासह १६ देशांमधील नागरिकांना जर्मनी देशात सुखरुप प्रवास करता येणार आहे.

- Advertisement -

मात्र जर्मनी अद्याप कोरोना संबंधीत नियमांप्रमाणे परदेशातील प्रवाशाला दोन आठवडे क्वारंटानई राहणे आणि लसीकरणनंतर देशात प्रवेश दिला जाणार आहे. आता भारतासह या देशांतील नागरिकांना कोरोना नकारात्मक चाचणी आणि १० दिवसाची क्वारंटान राहणाऱ्यावर देशात येण्याची परवानगी दिली जाईल. विलगीकरणाचा कालावधी ५ दिवसांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. नवीन नियम बुधवारपासून लागू होणार आहेत. दोन्ही डोस घेतल्यानंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश घेण्यास परवानगी देण्यात येणार आहे.


१२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी भाजपा आक्रमक, नागपुर, पुण्यात जोरदार निदर्शने


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -