घरदेश-विदेशनेपाळ: कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५० वर, ४ मृत्यू; पंतप्रधान ओलींनी भारताला ठरवलं दोषी

नेपाळ: कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५० वर, ४ मृत्यू; पंतप्रधान ओलींनी भारताला ठरवलं दोषी

Subscribe

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी कोरोनाच्या प्रसारावरुन दुसऱ्यांदा भारतावर आरोप केले आहेत. नेपाळमध्ये कोरोनाचा प्रसार हा भारतामुळे झाला, असा आरोप नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केला आहे.

नेपाळमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा ६५० च्या वर पोहोचला आहे, तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसाठी भारताला दोष दिला आहे. देशाला संदेश देताना ओली म्हणाले, “योग्य तपासणी न करता भारतातून नेपाळमध्ये प्रवेश केल्यामुळे कोरोना अधिक पसरत आहे. दक्षिण आशियातील इतर देशांपेक्षा नेपाळमधील परिस्थिती अद्याप चांगली आहे.”

नेपाळमध्ये आज कोरोना विषाणूची ७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्या मुळे देशातील संक्रमित लोकांची एकूण संख्या ६८२ वर पोहोचली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशव्यापी लॉकडाऊन २ जूनपर्यंत वाढवण्यात आलं आहे. २४ मार्चला नेपाळमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं.

- Advertisement -

नेपाळमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसारासाठी ओली यांनी भारताला दोष देण्याची ही दुसरी वेळ आहे. “भारतातून आलेला कोरोना विषाणूचा संसर्ग हा चीन आणि इटलीपेक्षा जास्त प्राणघातक आहे,” असं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की, “जे लोक भारतातून बेकायदेशीरपणे येत आहेत ते देशात हा विषाणू पसरवत आहेत. काही स्थानिक प्रतिनिधी आणि पक्षनेते योग्य तपास न करता लोकांना भारतातून आणण्यासाठी जबाबदार आहेत. ”


हेही वाचा – लॉकडाऊमध्ये नोकरी गेल्याने उत्पन्न थांबलं; या चार टीप्स नक्की वाचा

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत नेपाळची भूमिका बदलल्याचं दिसून आलं आहे. नेपाळ लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा आपला प्रदेश असल्याचा दावा करत आहे. भारत आणि नेपाळ कलापाणीला त्यांच्या सीमेचा अविभाज्य भाग म्हणतात. भारत त्याला उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्याचा भाग आणि नेपाळ यास धरचुला जिल्ह्याचा भाग म्हणतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -