घरCORONA UPDATEIndia Corona Update: देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्या एक हजाराने घट, तर मृतांचा...

India Corona Update: देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्या एक हजाराने घट, तर मृतांचा आकडा ९५५ वर

Subscribe

गेल्या २७ तासांत देशात ६३ लाख ८७ हजार ८४९ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून अनेक चढ-उतार पाहयला मिळत आहे. यात गेल्या २४ तासांत देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत शनिावारच्या तुलनेत एक हजाराने घट झाल्याचे पाहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. देशात गेल्या २४ तासांत ४३ हजार ०७१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज ५२ हजार २९९ वर पोहचली आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

- Advertisement -

देशातील एकूण बाधितांचा आकडा हा ३ कोटी ०५ लाख ४५ हजार ४३३ झाला आहे. तर आजपर्यंत २ कोटी ९६ लाख ५८ हजार ०७८ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णंची संख्या ४ लाख ८५ हजार ३५० झाली आहे. तर, आजपर्यंत देशात ४ लाख ०२ हजार ०५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आजपर्यंत ३५ कोटी १२ लाख २२ हजार ३०६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील गेल्या २७ तासांत देशात ६३ लाख ८७ हजार ८४९ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. देशातील कोरोनाचा मृत्यूदर १.३० टक्के आहे. तर रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्ण २ टक्क्यांहून कमी आहेत.

- Advertisement -

देशभरात ३ जुलैपर्यंत ४१ कोटी ८२ लाख ५४ हजार ९५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १८ लाख ३८ हजार ४९० नमुने काल पॉझिटिव्ह आढळल्याचे आयसीएमआरने जाहीर केले आहे.


MPSC उत्तीर्ण नोकरी नसल्याने पुण्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -