घरदेश-विदेशLive Update: राज्यात ५,१३२ नव्या रुग्णांची नोंद

Live Update: राज्यात ५,१३२ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासात ५,१३२ नव्या रुग्णांचे निदान करण्यात आले असून १५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज ८,१९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात २८३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा आज मृत्यू झालाय. मुंबईत आज २९७ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या एकही अँक्टिव्ह कंटेन्मेंट झोन नाहीये.

- Advertisement -

मुंबईत पुढील दोन दिवस शासकीय मनपा केंद्रांवरील लसीकरण बंद असणार आहे. शनिवारी २१ ऑगस्ट रोजी मुंबईतील लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मुंबई पालिका याबाबत अधिकृत माहिती जाहीर करणार आहे.


 

पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत २ कोटी उपचार पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.


सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, ५ सप्टेंबरच्या एनडीएचच्या परीक्षेत मुलींनाही घेता येणार सहभाग


मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहवर दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.


मंदाकिनी खडसे यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश


तालिबानला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता द्यावी, कोणत्याही देशांच्या दुतवासाला हानी पोहचणार नाही, महिलांनी सरकारमध्ये सामील होण्यासाठी पुढाकार घ्यावा,  तालिबान्यांची पहिली प्रतिक्रिया


शिवसेनाच्या भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी धोक्यात आली आहे. कारण आयकर विभागाने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत चुकीची माहिती दिली असे आयकर विभागाचे म्हणणे आहे.जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता ही बाब उघड झाली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -