घरताज्या घडामोडीबागलाण तालुक्यात कोरोनाचे संकट वाढले; सतर्कतेचा इशारा

बागलाण तालुक्यात कोरोनाचे संकट वाढले; सतर्कतेचा इशारा

Subscribe

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला असून, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यात मालेगावस्थित नामपूर येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारीच ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आल्याने मोसम खो-यातील जनतेमध्ये कोरोनाचे संकट वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले असून, राज्यभरात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात बुधवार (दि. १५) पर्यंत कोरोनाचे ४६ रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट वाढल्याच्या परिस्थितीत सध्या लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विलगीकरण केंद्र उभारणीसाठी परिसराची पाहणी

तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांच्यासह तहसीलदार इंगळे-पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, सरपंच अशोक पवार, ग्रामविकास अधिकारी केशव इंगळे यांनी नामपूर परिसराची पाहणी करून संपूर्ण गाव सील करण्याच्या सूचना दिल्या तसेच करोना संशयित रुग्णांसाठी गावालगत विलगीकरण केंद्र उभारण्यासाठी काकडगाव महाविद्यालय इमारत, जिल्हा परिषद मराठी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्याचप्रमाणे, संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण केंद्रात भरती करण्याच्या सूचनाही आमदार बोरसे यांनी संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या आहेत.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश

- Advertisement -

कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठीअनेक दिवसांपासून ग्रामपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी (दि. १४) रात्री वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेने दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -