घरदेश-विदेशधक्कादायक! Corona रूग्णांचं फुफ्फुस झालं लेदर बॉलसारखं टणक; देशातील पहिली घटना

धक्कादायक! Corona रूग्णांचं फुफ्फुस झालं लेदर बॉलसारखं टणक; देशातील पहिली घटना

Subscribe

शवविच्छेदन करताना आढळून हा धक्कादायक प्रकार

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीरावर गंभीर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या रुग्णाचे निधन झाले. या मरण पावलेल्या रुग्णाचं फुफ्फुस लेदर बॉलसारखं टणक झाल्याचे शवविच्छेदन करताना आढळून आले आहे. हा धक्कादायक प्रकार कर्नाटकात घडल्याचे समोर आले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाचे विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्या फुफ्फुसावर हल्ला करतात. यात अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. कोरोना विषाणुमुळे रुग्णाच्या फुफ्फुसाची अवस्था भयंकर होते, हे कर्नाटकातील रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर दिसून आले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

कोरोनामुळे ६२ वर्षांच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू फुफ्फुसाची विचित्र अवस्था झाल्यानंतर रुग्णाचा बळी गेल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर १८ तासांनंतरही त्याच्या नाक व घशात कोरोनाचे जिवंत विषाणू आढळून आले. त्यामुळे यातून रुग्णाच्या मृत्यूनंतरही मृतदेहाच्या संपर्कात आल्यास कोरोना होऊ शकतो, अशी माहितीही समोर आली आहे.

ऑक्सफर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी असे सांगितले की, “या रुग्णांचे फुफ्फुस कोरोनाच्या संक्रमणामुळे एखाद्या लेदर बॉलसारखे झाले होते. फुफ्फुसात हवा भरणारा भाग पूर्णपणे खराब झालेला होता. तर वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनल्या होत्या. मृतदेहाच्या तपासणीमुळे कोरोनाची नवी अवस्था समजून घेण्यास मदत मिळाली आहे,” दरम्यान मृतदेहाच्या नाक, घसा, तोंड, फुफ्फुसाचा पृष्ठभाग, चेहरा व गळ्याच्या त्वचा अशा पाच ठिकाणचे नमुने घेतले होते. आरटीपीसीआर चाचणीनंतर कळाले की घशात आणि नाकात कोरोना विषाणू आढळून आले. त्यातूनच ही माहिती समोर आली की, कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासूनही दुसरे लोक संक्रमित होऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले.


PUC चेक करा नाहीतर खिशाला बसणार मोठा फटका; जाणून घ्या, नवा Traffic Rule

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -