घरदेश-विदेशPUC चेक करा नाहीतर खिशाला बसणार मोठा फटका; जाणून घ्या, नवा Traffic...

PUC चेक करा नाहीतर खिशाला बसणार मोठा फटका; जाणून घ्या, नवा Traffic Rule

Subscribe

सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत वैध पीयूसी प्रमाणपत्र नसल्याबद्दल दंड १ हजार रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

तुमच्याकडे दुचाकी किंवा चारचाकी वाहन आहे का? तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. तुमच्याकडे असणाऱ्या वाहनाचे PUC केले आहे का? कारण जर तुमच्याकडे असणाऱ्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसेल तर पुढच्या वेळी रस्त्यावर गाडी आणताना विचार करा…प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र नसेल आणि तरू तुम्ही रस्त्यावर गाडी आणली तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

दंडाच्या रकमेत दहा पट वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, पीयूसी नसेल तर १० हजार रुपये दंड भरावा लागेल. मागील वर्षी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने नियमात बदल केला असून दंडाच्या रकमेत दहा पट वाढ केली आहे. पूर्वी पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर फक्त एक हजार रुपये दंड भरण्याची तरतूद होती, परंतु सरकारने ती वाढवून १० हजार रुपये केली आहे. १ सप्टेंबर २०१९ पासून दिल्लीमध्ये लागू झालेल्या सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत वैध पीयूसी प्रमाणपत्र नसल्याबद्दल दंड १ हजार रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. दहापट दंड वाढीमुळे दिल्लीतील सुमारे १ हजार पीयूसी केंद्रांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परिवहन विभागाने त्या महिन्यात तब्बल १४ लाख पीयूसी प्रमाणपत्रे दिली.

- Advertisement -

पीयूसी नाही तर विमा नाही

सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे, विमा कंपन्या वैयक्तिक विमा पॉलिसीच्या नूतनीकरणाच्या वेळी वैध पीयूसीची पडताळणी करतात. आयआरडीएने २० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात असं म्हटलं आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) दिल्ली आणि एनसीआरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. म्हणूनच, या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सुनिश्चित केले पाहिजे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जुलै २०१८ मध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते. पीयूसी प्रमाणपत्र सादर करेपर्यंत वाहन विमा पॉलिसीचे नूतनीकरण करू नये.


UPSC 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -