घरमहाराष्ट्रकोरोनाबाधितांना दिलासा : राज्यात ५९ औषध केंद्रांवर २३६० रुपयांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार 

कोरोनाबाधितांना दिलासा : राज्यात ५९ औषध केंद्रांवर २३६० रुपयांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळणार 

Subscribe

राज्य सरकारने हे इंजेक्शन २३६० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना हे इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी राज्यामध्ये ५९ केंद्रे निश्चित केली आहेत.

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन सहज उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने हे इंजेक्शन २३६० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना हे इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी राज्यामध्ये ५९ केंद्रे निश्चित केली आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेणा-या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी राज्यात मोठया प्रमाणावर येत असून त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना निश्चित केलेल्या दरात रेमडेसीवीर उपलब्ध होण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत प्रत्येक जिल्हयात खाजगी औषधी केंद्रे निश्चित केली आहेत. या केंद्रांवर २३६० रुपयांमध्ये रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत इंजेक्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्यामध्ये ५९ औषध केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये अमरावती विभागात ५, कोकण विभागात १०, नागपूर विभागात ६, औरंगाबाद विभागात ११, नाशिक विभागात ९, बृहन्मुंबई विभागात ५ आणि पुणे विभागात १३ औषध विक्रेते निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णांना इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.

- Advertisement -

इंजेक्शनची आवश्यकता असणार्‍या रुग्णालयाने त्याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्यासोबत प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, आधार कार्ड किंवा छायाचित्र असलेले परवाना अथवा प्रमाणपत्र तसेच रुग्णाची वैद्यकीय माहिती कळविणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -