घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोना रोखण्यासाठी २०२२ पर्यंत सोशल डिस्टन्सिंग सांभाळा!

CoronaVirus: कोरोना रोखण्यासाठी २०२२ पर्यंत सोशल डिस्टन्सिंग सांभाळा!

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगातील अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लॉकडाऊन जाहीर केला आहे. भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. यादम्यान सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणखीन कठोर केले गेल आहेत. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे काही महिन्यांतच या संकटातून मुक्त होणार अशी आशा अनेक देशांना आहे.

मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २०२२ पर्यंत सोशल डिस्टन्सिंगची गरज भासणार आहे, असा इशार वैज्ञानिकांनी दिला आहे. नवीन अभ्यासात संशोधकांना असं म्हटलं आहे की, येत्या काही वर्षात पुन्हा कोरोना विषाणू थैमान घालणार आहे.

- Advertisement -

जर्नल सायन्स मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असं म्हटलं आहे की, फक्त एकदा लॉकडाऊन करून महामारीवर मात करणे कठीण आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे विशेषतज्ज्ञ आणि लेखक मार्क लिपसिच म्हणाले की, विषाणूचे संक्रमण दोन गोष्टी झाल्यावर पसरते, एक संक्रमित व्यक्ती आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले व्यक्ती. जोपर्यंत जगातील जास्ती जास्त लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढत नाही तोपर्यंत लोक असुरक्षित आहेत.

कोरोना विषाणूवर उपायकारक लसीचा शोध लागला नाही तर २०२५ पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात दुप्पटीने वाढले. विशेषतज्ज्ञ मार्क म्हणतात की, सद्याची स्थिती पाहता २०२० पर्यंत कोरोनाचा अंत कसा होईल हे सांगणे योग्य नाही.

- Advertisement -

अमेरिकन सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समितीने असं सुचवलं होत की, रुग्णातील रुग्णांची संख्या घटण्याकरिता बराच काळ शारीरिक अंतर ठेवणे गरजचे आहे. सरकारने अगोदर पासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम जारी केले पाहिजे होते.

कोरोनाच्या संकटात अशाप्रकारच्या अनेक भविष्यवाणी कळल्या जात आहे. मात्र त्यात किती तथ्य आहे याबाबत कोणालाही माहित नाही आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २० लाखाहून अधिक आहे. तसंच १ लाख २८ हजारहून अधिका लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: धक्कादायक! निकृष्ट दर्जाचे पीपीई किट भारत चीनकडून घेणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -