घरताज्या घडामोडीलस दिल्यानंतरही कोरोनाचा धोका टळणार नाही? तेलंगणा राज्याचा धक्कादायक अहवाल

लस दिल्यानंतरही कोरोनाचा धोका टळणार नाही? तेलंगणा राज्याचा धक्कादायक अहवाल

Subscribe

जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लस तयार करण्यात गुंतले आहे. परंतु कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कोरोना विषाणूपासून लस शरीराला कायम सुरक्षित ठेवले का? या प्रश्नाचे उत्तर लस आल्यानंतर मिळले. परंतु त्यााधी तेलंगणाच्या एका अहवालाने सर्वांची चिंता वाढवली आहे. तेलंगणा सरकारचे म्हणणे आहे की, ‘मंगळवारी राज्यात असे दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत, ज्यांना पुन्हा एकदा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पहिल्यांदा उपचार केल्यानंतर हे दोन रुग्ण रिकव्हर झाले होते.’ अशा परिस्थितील लस दिल्यानंतरही कोरोनाची लागण होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.

हाँगकाँगमध्येही पुन्हा कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले

हाँगकाँगमध्ये एका तरुणाला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेले हे जगातील पहिले प्रकरण असल्याचा दावा देखील केला आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, या तरुणाला साडेचार महिन्यांनंतर कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

कोरोनामधून बरे झाल्यानंतर प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?

कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्ण विषाणूविरोधात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज विकसित होतात, असा दावा केला आहे. पण हाँगकाँग मधील तरुणातील प्रतिकारशक्ती साडेचार महिन्यांनी संपली. हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या मायक्रोबायोलॉजिस्ट केल्विन कायवेंग यांच्या मते, ‘कोरोना लागण झाल्यानंतर शरीरातील प्रतिकार शक्ती कायमस्वरुपी टिकत नाही, म्हणजे तो पुन्हा होणारा संसर्ग रोखू शकत नाही, असे एका शोधातून सिद्ध झाले आहे.’

‘पुन्हा कोरोना होण्याचा धोका’

तेलंगणा आरोग्यमंत्री इतेला राजेंद्र यांच्या मते, एखादा व्यक्ती कोरोनातून बरा झाला असेल तर तो पुन्हा एकदा संक्रमित होणार नाही याची शाश्वती देता येत नाही. पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्यानंतर ज्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज विकसित होऊ शकत नाही त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते.

- Advertisement -

लस नेहमी कोरोनापासून आपले संरक्षण करते का?

तज्ज्ञांच्या मते, ‘जोपर्यंत लस येत नाही आणि तिच्या प्रभावाचे मुल्यांकन होत नाही तोपर्यंत कोरोना संक्रमित व्यक्तीचे लस संरक्षण करेल असे म्हणणे कठीण आहे.’ रशियाची लस ‘स्पुतनिक व्ही’ तयार करणाऱ्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूविरोधात दोन वर्ष लस शरीराला संरक्षण देईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -