घरताज्या घडामोडीCorona Third Wave: जगभरातील देशांमध्ये तिसऱ्या लाटेचे संकेत, कोरोना रूग्णसंख्येत वाढ

Corona Third Wave: जगभरातील देशांमध्ये तिसऱ्या लाटेचे संकेत, कोरोना रूग्णसंख्येत वाढ

Subscribe

भारतात कोरोनाच्या आकडेवारीनुसार सध्या कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांच्या संख्येत घट पहायला मिळत आहे. पण जगभरात अनेक देशात मात्र कोरोनाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा डोक वर काढल आहे. त्यामुळेच अनेक देशांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली पहायला मिळत आहे. अनेक देशात वेगाने कोरोना रूग्णांची संख्येतील वाढ पहायला मिळत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असाही इशारा आता देण्यात येत आहे. रशियामध्ये अवघ्या तीन दिवसातच कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा १ हजारांवर पोहचला आहे. त्यापाठोपाठच अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कोरोनाने थैमान घालायला सुरूवात केली आहे.

रशियात अचानकपणे कोरोनाच्या संक्रमित रूग्णांच्या आकड्यात वाढ दिसून आली आहे. त्यातच कोरोना मृत्यूचा आकडाही अतिशय वेगाने वाढतो आहे. रशियाच्या द नॅशनल कोरोना व्हायरस टास्क फोर्सनेही दिलेल्या अहवालात ऑक्टोबरमध्ये दैनंदिन रूग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचे म्हटले आहे. सप्टेंबरच्या तुलनेत रशियात दरदिवशी १०० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. रूसच्या सरकारने कोरोना संक्रमण नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंध लावण्याचा निर्णय आता क्षेत्रीय प्राधिकाऱ्यांवर सोपावला आहे. पण रशियात लॉकडाऊनसाठी लोकांचा विरोध होत आहे.

- Advertisement -

US, UK मध्ये वाढताहेत आकडे

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसविरोधी लसीकरण वेगाने होत आहे. पण तरीही कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातही लॉकडाऊन हटल्यानंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ पहायला मिळाली आहे. तर न्यूझीलंडमध्येही कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होताना, सहा आठवड्यात पहिल्यांदाच कोरोना रूग्णसंख्येत वाढ झाली आहे. गुरूवारी विक्टोरियात २२९७ नवीन कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजधानी मेलबर्नमध्ये कोरोना रूग्णांची आकडेवारी पहायला मिळाली आहे. याठिकाणी कोरोनाच्या डेल्टा वेरीयंटचे केंद्र आहे.

याठिकाणी लॉकडाऊनची शक्यता

न्यूझीलंडमध्ये गुरूवारी कोरोनाच्या आकड्यात गेल्या सहा आठवड्यांमधील सर्वात मोठी अशी वाढ आहे. सर्वाधिक रूग्ण हे ऑकलंडमधून दिसून आले आहेत. याठिकाणी लॉकडाऊनसाठीचा विचार सध्या करण्यात येत आहे. ऑकलंडच्या १७ लाखांच्या लोकसंख्येसाठी सक्तीने कोरोनाची नियमावली अंमलात येईल असे बोलले जात आहे. ऑकलंडही डेल्टा वेरियंटचे केंद्र आहे. कोरोनाची तिसरी लाट याठिकाणी धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना निर्बंधातून लहान मुलांची सुटका, १८ वर्षाखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -