घरताज्या घडामोडीLive Update: मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारला

Live Update: मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारला

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारला


राठोड प्रकरणात कुणीलाही पाठीशी घालणार नाही – मुख्यमंत्री

- Advertisement -

थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद होणार सुरू होणार आहे.


वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा दिला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

‘वर्षा’ निवासस्थानावरील मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांची बैठक संपली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांची बाजू ऐकली असून सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. सविस्तर वाचा


वनमंत्री संजय राठोड आपल्या पत्नीसह निवासस्थानाहून रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी राठोड वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेणार आहेत.


राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्यांना लैंगिक व्यवहाराचा स्वैराचार दिला आहे का? जर सरकार संजय राठोड यांचा राजीनामा घेत नसेल तर भाजुचे आमदार राजीनामा देतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सामान्यांकरीत वेगळा न्याय आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आहे का? असा संतप्त सवाल फडणवीस यांनी केला.


इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम लॉन्च केली आहे. PSLV द्वारे सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी १९ उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण झालं. PSLV-C51 हे PSLV चे ५३ वे मिशन आहे.


दुपारी ४ वाजता : मराठा आरक्षणाबाबत बैठक, सायंकाळी ५.३० वाजता : अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठक आणि  सायंकाळी ६.३० वाजता : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार

स्थळ: सह्याद्री अतिथीगृह सभागृह


प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी साधणार संवाद साधत असतात. आज २८ फेब्रुवारी रोजी देखील ते ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशात पुन्हा वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग, कोरोना लसीकरण, आणि अद्याप सुरु असलेले शेतकरी आंदोलन याबाबत पंतप्रधान मोदी देशवासियांशी संवाद करणार आहे.


पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन हत्या केल्यानंतर दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला. ३० वर्षीय तरुणाच्या हत्येमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. चतुःश्रुंगी परिसरातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ( NCL) हा विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत होता. गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून सुदर्शनची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह सूस खिंडीत टाकण्यात आला. याबाबत सुदर्शनचा चुलत भाऊ संदीप यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात खुनासह पुरावा नष्ट करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात शुक्रवारी ८ हजार ३३३ नवे कोरोनाबाधित आढळल्यानंतर, आजदेखील ८ हजार ६२३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, काल राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता तर आज मृत्युंची संख्या ५१ आहे. यावरून कोरोना संसर्गाचे प्रमाण आपल्या लक्षात येते. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असुन, आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -