घरताज्या घडामोडी'ही' स्वदेशी लस सरकारसाठी २५० रुपयांत मिळणार

‘ही’ स्वदेशी लस सरकारसाठी २५० रुपयांत मिळणार

Subscribe

सध्या भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण भारत ज्या लसीकडे डोळे लावून बसला आहे त्या ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस सरकारला २५० रुपयांत मिळणार आहे. तर खासगी औषध विक्रेत्यांना कोविशिल्डच्या एका डोससाठी एक हजार रुपये मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

दिवाळीनंतर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीबाबत दिलायादायक माहिती दिली आहे. अत्यावश्यक वापरासाठी ‘कोविशिल्ड’ लस वर्षा अखेरस आणू, असा दावा देखील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वत्तीने करण्यात आला आहे. तसेच जानेवारी-फेब्रवारीमध्ये ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस बाजारात उपलब्ध करू, असा विश्वास अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. माहितीनुसार ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस ९० टक्के यशस्वी झाला आहे. तर दुसरा डोस ६२ टक्के यशस्वी झाला आहे. ‘कोविशिल्ड’ व्यतिरिक्त भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लसची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या लसीसाठी आयसीएमआरसोबत भागीदारी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान पंतप्रधान नरेंदी मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान भेट देणार असल्याचे समोर येत आहे. कोरोना संदर्भातील आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र पुण्यात येणार आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९१ लाख ७७ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८६ लाख ३ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लसीची किंमत केली जाहीर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -