घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; दोन जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; दोन जवान शहीद

Subscribe

शोधमोहिमेदरम्यान सीआरपीएफच्या जवानानी नक्षलवाद्यांचा तळ उद्धवस्त केला

छत्तीसगढ येथील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफचे जवान यांच्यामध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन जवान शहीद झाले. तर या चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका गावकऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे.

सीआरपीएफची एक टीम सीआऱपीएफच्या मदतीसाठी पाठवण्यात आली आहे. शहीद झालेला एक जवान सीआरपीएफच्या १९९ बटालियनमधील होता. सीआरपीएफची १९९ बटालियन आणि स्थानिक पोलिस यांच्या संयुक्त पथकाने शोधमोहिम हाती घेतली होती; त्यावेळी केशकुतूल गावाजवळ जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. यावेळी दोन सीआरपीएफ जवान शहीद झाले.

- Advertisement -

दुसऱ्या शोधमोहिमेदरम्यान सीआरपीएफच्या जवानानी नक्षलवाद्यांचा तळ उद्धवस्त केला, दरम्यान महाराष्ट्राच्या सीमेजवळ असलेल्या छत्तीसगमधील राजनंदगाव येथे झालेल्या चकमकीदरम्यान जवनांनी ही कारवाई केली. इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) २७ व्या बटालियनकडून ही कारवाई करण्यात आली असून घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -