घरदेश-विदेशDatta Jayanti 2020: जाणून घ्या दत्तजयंतीचं महत्त्व आणि पूजा विधी

Datta Jayanti 2020: जाणून घ्या दत्तजयंतीचं महत्त्व आणि पूजा विधी

Subscribe

यंदा दत्त जयंती २९ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार

यंदा दत्त जयंती २९ डिसेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला होता. धार्मिक ग्रंथानुसार भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचेही रूप मानले जाते. दत्ताचे देव आणि गुरू ही दोन्ही प्रकार आहेत, ज्यामुळे त्यांना श्री गुरुदेवदत्त देखील म्हटले जाते.तर भगवान दत्त यांनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले. त्यांच्या नावावरच दत्त संप्रदाय उदयास आला. दक्षिण भारतातही त्यांची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी त्यांचे भक्त उपवास करतात. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्ताचे व्रत ठेवून त्याची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रावर प्रदोषकाळी भगवान दत्ताचा जन्म झाला. म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री जेथे दत्त मंदिर असते त्याठिकाणी या दिवशी प्रदोषकाळी दत्तजन्म सोहळा साजरा केला जातो. दत्तजयंत्तीच्या निमित्ताने ‘श्री गुरूचरित्र’ या ग्रंथाचे पारायण सामूहिक पद्धतीने किंवा घरोघरी केले जाते. महाराष्ट्रासह दक्षिणेतही आंध्र, कर्नाटकासह तामिळनाडूमध्ये दत्तजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.

- Advertisement -

दत्त जन्म कथा

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्त जयंतीचे शुभ मुहूर्त 

  • पौर्णिमा तिथी प्रारंभ (२९ डिसेंबर २०२०)
    सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपासून
  • पौर्णिमा तिथी समाप्त (३०डिसेंबर २०२०)
    सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांपर्यंत

अशी करा दत्त जयंतीची पूजा

  • सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला.
  • पूजेच्या आधी गंगाजल किंवा पाणी पूजेच्या जागी शिंपडावे आणि त्यावर स्वच्छ आसन ठेवा.
  • भगवान दत्तात्रयाच्या फोटोला यानंतर फुले, हार इत्यादी अर्पण करा.
  • धूप, दीप आणि अगरबत्ती लावून मनोभावे दत्ताची उपासना करा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -