घरदेश-विदेशनिसर्ग चक्रीवादळ आधी अलिबागला धडकण्याची शक्यता; १२ तास अतीमहत्त्वाचे

निसर्ग चक्रीवादळ आधी अलिबागला धडकण्याची शक्यता; १२ तास अतीमहत्त्वाचे

Subscribe

भारतीय हवामानशास्त्र विभागा (आयएमडी) यांनी निर्सग चक्रीवादळाची शक्यता वर्तवली असून आता पुढील १२ तास अतीमहत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळात याचे रुपांतर झाले असून याचा परिणाम हरिहरेश्वर ते दक्षिण गुजरातच्या परिसरात दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही तास महत्त्वाचे असून उद्या, ३ जून रोजी दुपारी हे वादळ धडकण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. निसर्ग चक्रीवादळ हे मुंबईच्या दक्षिणेस असलेल्या अलिबागच्या अगदी जवळ धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून समुद्रकिनाऱ्यांवर एनडीआरएफच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, एनडीआरएफचे पथक सिंधुदुर्ग, पालघर, रायगडमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने श्रीवर्धनला समुद्राची पाहणी केली असून सिंधुदुर्ग तारकर्ली समुद्र किनारी पाहणी करून डहाणू दातीवडे येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. हे वादळ सध्या ९० ते १०० किमी प्रतितास वेगाने येत आहे. जसजसे हे वादळ आणखी जवळ येईल तसा त्यांचा वेग १०५ ते १२५ किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचे सांगितले आहे. तसेच मच्छिमारांना आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप भागात आणि केरळ किनारपट्टीवर न जाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच मुंबईतील उपनगरी जिल्हा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने सोमवारी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करत येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा –

एका क्लिकवर कळू शकणार हॉस्पिटलमध्ये किती बेड आणि व्हेंटिलेटर आहेत उपलब्ध!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -