घरदेश-विदेशटेलरनेच केली फॅशन डिझायनर महिलेची हत्या

टेलरनेच केली फॅशन डिझायनर महिलेची हत्या

Subscribe

दिल्लीतील माला लखानी या फॅशन डिझायनरची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिच्याकडे काम करणाऱ्या टेलरला आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

पैशावरून उदभवलेल्या वादामुळे एका टेलरने फॅशन डिझायनरची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. या हत्याकांडात फॅशन डिझायनर महिलेबरोबर तिच्या घरातील नोकराचाही खून करण्यात आला. दिल्लीतील वसंतकुंज परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून टेलरला अटक केली आहे. केलेल्या कामाचे पैसे न दिल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून पुढील कारवाईस सुरुवात केली आहे.

कसा घडला प्रकार

माला लखानी (५३) असे या महिलेचे नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून माला फॅशन डिझायनींग क्षेत्रात कार्यरत होती. दिल्लीत वसंतकुंज परिसरात तीचा बंगला होता. बंगल्यात माला एकटीच राहात होती. घरकामासाठी बाहादूर (५०) नावाचा नोकरही घरी होता. मालाने कपडे शिवण्याचे काम एका टेलरला दिले होते. मागील काही दिवसांपासून या दोघांमध्ये पैशामुळे वाद निर्माण झालेत. बुधवारी उशीरारात्री हा टेलर आपल्या दोन मित्रांबरोबर मालाच्या घरी आला होता. त्याने मालाला मारण्याचा प्रयत्न केला. मात्रमालाने आरडा ओरड करण्याचा प्रयत्न केला. मालाचा आवाज ऐकून घरातील नोकर बाहदूर तिला वाचवण्यासाठी गेला. मात्र टेलर आणि त्याच्या मित्रांनी या दोघांचा खून केला व घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

- Advertisement -

“दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपींचा शोध घेतला. हत्येनंतर हे आरोपी पसार होण्याचा प्रयत्न करत होते. मात्र योग्य माहिती मिळवून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदवला असून न्यायालयासमोर या आरोपींना उभे करणार आहे.” – दिल्ली पोलीस तपास अधिकारी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -