घरदेश-विदेशपोटातून निघालं सीमकार्ड, ब्लेड आणि बरंच काही...

पोटातून निघालं सीमकार्ड, ब्लेड आणि बरंच काही…

Subscribe

सदर रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी ब्लेड, चाव्या, नाणी, पेन्सिल, शार्पनर आणि चुंबक अशा एकूण ३८ वस्तू बाहेर काढल्या.

एखाद्या रुग्णाच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे ट्युमर किंवा अतिरिक्त मांस काढले जाते, याविषयी तुम्हालाही माहिती असेल. मात्र, अलीकडे रुग्णांच्या पोटातून काही अजग गजब वस्तू निघाल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना घडली आहे चेन्नई शहरातील एका हॉस्पिटलमध्ये. सदर हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या एका रुग्णाच्या पोटाची शस्त्रक्रिया करुन चक्क ब्लेड, चाव्या, नाणी, पेन्सिल, शार्पनर आणि चुंबक अशा एकूण ३८ वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. ही शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही हे पाहून काही काळ थक्क झाले होते. एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये अशाप्रकारच्या ३८ वस्तू एकावेळी कशा राहू शकतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र, वास्तवात ही घटना घडली आहे. एका खासगी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, एकूण पाऊण तास सुरु असलेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्या ५२ वर्षीय व्यक्तीच्या पोटातून ३८ वस्तू बाहेर काढल्या. इतक्या वस्तू पोटात असूनही या माणसाला दुखलं कसं नाही? हा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.


वाचा : रुग्णाच्या पोटातून काढले चक्क १२२ खिळे

दरम्यान, ज्या व्यक्तीच्या पोटातून वस्तूंचा हा साठा बाहेर काढण्यात आला तिचं नाव जयकुमार असं आहे. जयकुमार हा एक मानसिक रुग्ण असल्याचं वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आलं आहे. बहुधा म्हणूनत इतक्या वस्तू गिळताना आणि गिळल्यानंतरही त्याची जयकुमारला जाणीव झाली नसावी. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व वस्तू त्याच्या पोटातील चुंबकाला चिकटलेल्या होत्या. जयकुमारचे वय पाहता डॉक्टरांनी दोन दिवस दोन वेळा त्याची गॅस्ट्रोस्कोपी केली. पहिल्या दिवशी पोटातून २० आणि दुसर्‍या दिवशी १८ वस्तू बाहेर काढल्या. खरंतर जयकुमारचं त्याच्या मानसिक आजारासाठी स्कॅनिंग करण्यात येत होतं. मात्र, त्यावेळी त्याच्या पोटात दडलेल्या वस्तूंचा डॉक्टरांना खुलासा झाला. स्कॅनिंगदरम्यान ज्यावेळी स्कॅनिंग मशीनमधील चुंबकीय क्षेत्रं सक्रिय झालं, तेव्हा रुग्णाच्या पोटात अचानक दुखू लागलं. त्यानंतरच या धक्कादायक प्रकार समोर आला.

- Advertisement -

सदर रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर डॉक्टरांकडून पुढील उपचार केले जात असल्याची माहिती मिळते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -