घरदेश-विदेशकुत्र्याचं मालकावर असलेले 'असं' प्रेम तुम्ही बघितले आहे का?

कुत्र्याचं मालकावर असलेले ‘असं’ प्रेम तुम्ही बघितले आहे का?

Subscribe

एका पाळीव कुत्र्याला मालकाने घराबाहेर सोडल्याचा व्हिडिओ इंटरनेटव व्हायरल झाल आहे. ही सीसीटीवी फुटेजमुळे अनेकांचे डोळे पाणावले.

पाळीव प्राणी ठेवण्याची आवड अनेकांना असते. पाळीव प्राणी हे आपल्या बरोबर राहून कुटुंबाचाच एक भाग बनतात. अनेकदा प्राणी लहान असतानाच विकत घेतले जातात. प्राण्यांच्या वयानुसार प्राणीही समजदार होतात. मोठ्या कुत्र्यांपेक्षा लहान कुत्र्यांचे अधिक आकर्षन मालकांना असते. वेळेनुसार मानसाचे प्रेम हे कुत्र्यासाठी कमी होते मात्र कुत्र्याचे प्रेम हे आपल्या मालकाच्या प्रती तितकेच असते. याचे एक जिवंत उदाहरण नुकतेच समोर आले आहे. आपल्या पाळीव कुत्र्याला सोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या मालकाचा पिच्छा कुत्रा सोडत नव्हता. हे दृष्य सीसीटीवीत कैद झाले आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले. या व्हिडिओला लोकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. व्हिडिओ खाली अनेकांना भावनीक कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ कोणत्या देशातील असल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisement -

काय आहे या व्हिडिओत

नाताळ सनाच्या रात्री एका गाडीमधून इसम आपल्या पाळीव कुत्र्या बरोबर उतरतो. या कुत्र्याला गाडीच्या थोड दूर नेऊन त्याला सोडून. कुत्र्यांचा बेड ही तो रस्त्यावरच फेकून गाडीत बसतो. आपला मालक आपल्याला सोडून जात असल्यामुळे हा कुत्रा अनेकदा गाडीच्या खिडकीवर उभा राहतो. गाडीच्या मागे पुढे फिरून हा कुत्रा गाडी थांबवण्याचाही प्रयत्न करतो आहे. मालकाची ओढ या व्हिडिओमधून प्रेक्षकांना सहज दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -