घरदेश-विदेशचीनमध्ये वटवाघुळानंतर आता कुत्र्याच्या मांस विक्रीचा बाजार सुरू!

चीनमध्ये वटवाघुळानंतर आता कुत्र्याच्या मांस विक्रीचा बाजार सुरू!

Subscribe

दहा दिवस असणाऱ्या या डॉग मीट फेस्टिव्हलमध्ये, हजारो कुत्र्यांची कत्तल करण्यात येणार

जगभरात कोरोना पसरल्याबद्दल टीका होत असलेल्या चिनी लोकांचा प्राणी खाण्याचा मोह अद्याप संपलेला दिसत नाही. गेल्या वर्षी वुहानमध्ये वटवाघुळांमुळे व्हायरस पसरून महामारी सारखी परिस्थिती निर्माण झाली असतानाही, आता युलिन शहरात कुत्र्यांच्या मांस विक्रीचा बाजार सुरू करण्यात आला आहे. दहा दिवस असणाऱ्या या डॉग मीट फेस्टिव्हलमध्ये, हजारो कुत्र्यांची कत्तल करण्यात येणार आहे.

वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांचे मांस खाण्यास बंदी असताना आणि त्यास निर्बंध असणारी सरकारची मोहिम सुरू असताना देखील कुत्र्यांचे मांस विक्री करणाऱ्या ‘डॉग मीट फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. येथे फक्त कुत्र्यांवर अत्याचार होणार नाहीत तर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही वाढेल. दरम्यान ‘डॉग मीट फेस्टिवल’च्या संयोजकांचे म्हणणे आहे की, कोरोनाची भिती लक्षात घेता या कार्यक्रमातील लोकांची संख्या कमी असणार आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर, जनावर अन्न म्हणून खाण्यासंदर्भात सरकारकडून बनविलेले नवीन नियम लक्षात घेता, प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी यूलिनमध्ये सुरू असलेला डॉग मीट फेस्टिवल हा शेवटचा असेल, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांचे असे मत आहे की, भविष्यात कोरोनासारखे साथीचे रोग टाळण्यासाठी चिनी लोकांना केवळ जनावरांसाठीच नव्हे तर स्वतःच्या आरोग्यासाठी देखील त्यांच्या खाण्याच्या सवयी बदलण्याची आवश्यकता आहे.

वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर, वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कायदा करण्याचा दबाव सरकारकडून वाढवण्यात आला आहे. म्हणूनच या वर्षाच्या फेब्रुवारी अखेरीस वन्य प्राण्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

एप्रिलमध्ये शेन्झेन शहरात वन्यजीवनाच्या खरेदी-विक्रीच्या निषेधामुळे कुत्र्यांचे मांस खाण्यास बंदी घालण्यात आली होती. चिनी कृषी मंत्रालयाने आता कुत्र्यांना पाळीव प्राणी म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे यूलिनमध्ये सुरू असलेल्या फेस्टिवलवर त्याचा कोणता परिणाम होणार, हे स्पष्ट झाले नाही.

अभ्यासानुसार, कोरोना विषाणू चीनमधील वुहानपासून संपूर्ण जगात पसरला आहे. तिथल्या एका व्यक्तीच्या वटवाघुळाचे मांस खाल्ल्याने त्याच्या शरीरात कोरोनाने प्रवेश केला. यानंतर विषाणूचे संक्रमण मनुष्यापासून ते मनुष्यापर्यंत पसरण्यास सुरूवात झाली.


मध्यरात्री बिबट्याचे पिल्लू बघणे पडले महागात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -