घरदेश-विदेशPulwama Terror Attack: डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'ही अत्यंत भयानक परिस्थिती'

Pulwama Terror Attack: डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘ही अत्यंत भयानक परिस्थिती’

Subscribe

'पुलवामा येथील दहशतवादी घटना ही अत्यंत भयानक परिस्थिती आहे', असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

१४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ल्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात केंद्रिय राखीव दलाचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटं पाडण्याचा प्रयत्न भारत करत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पूर्णपणे समर्थन दिले आहे. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अत्यंत भयानक परिस्थिती आहे. त्याचबरोबर आपण यासंबंधीचे सर्व रिपोट्स तपासत असून याप्रकरणी लवकरच एक स्टेटमेंट जारी करणार असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये एक पत्राकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. दक्षिण आशियातील या दोन्ही शेजारी देश एकत्र आले तर फार चांगले होईल. त्याचबरोबर ट्रम्प म्हणतात की, मी पाहिलं आहे. मला अनेक रिपोट्सही मिळाले आहेत. योग्य वेळी मी यावर प्रतिक्रिया देईल. जर पाकिस्तान आणि भारत एकत्र आले तर फार बरं होईल. पुलवामा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक परिस्थिती आहे. या संबंधी आम्हाला अनेक रिपोट्स मिळत आहेत. आम्ही याबाबत लवकरच स्टेटमेंट जारी करणार आहोत.’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -