घरट्रेंडिंगभाजपच्या डिजीटल प्रचारासाठी सेलिब्रिटींना हवी लाखोंची 'रोकड' - कोब्रापोस्टचे स्टिंग

भाजपच्या डिजीटल प्रचारासाठी सेलिब्रिटींना हवी लाखोंची ‘रोकड’ – कोब्रापोस्टचे स्टिंग

Subscribe

निवडणुकीच्या तोंडावर बॉलिवूड कलाकारांचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजपाच्या प्रचारासाठी ब्लॅक मनीही स्विकारण्याची तयारी कलाकारांनी दाखवली आहे. कोब्रापोस्टचे या स्टिंग ऑपरेशनने खळबळ माजवली आहे.

देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वे राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. राजकारणात बॉलिवूड कालाकांचा प्रचारासाठी वापर केला जातो. अनेक कलाकारही राजकीय पक्षांनी केलेल्या कामांमुळे आपण पक्षाचे समर्थन करत असल्याचे सांगतात. पडद्यावर दिसणारे कलाकांची प्रतिमा अगोदरच मतदारांमध्ये निर्माण झाली असते. या कलाकारांचा वापर करून मत परिवर्तन करण्याचे काम अनेकदा केले जाते. कलाकारांचा फॅन फॉलोइंगचे मतात रुपांतर करण्याचा प्रकार एका स्टिंग ऑपरशेनमधून समोर आला आहे. कोब्रापोस्ट या वेबसाइटने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. यामध्ये तब्बल ३० हून अधिक कलाकारांनी पैसे घेऊन राजकीय पक्षाचा प्रचार करण्याची कबुली दिली आहे. हा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका जनसंपर्क कंपनीच्या नावाने हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. याचे व्हिडिओ ट्विटरवर टाकल्यानंतर निवडणुकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. या कलाकारांमध्ये अनेक बॉलिवूडच्या कलाकारांचा आणि मालिका कलाकारांचा समावेश आहे.

कसे केले स्टिंग ऑपरेशन

कोब्रापोस्टच्या वार्ताहरांनी एका जनसंपर्क कंपनीच्या नावाने या कलाकारांची भेट घेतली. राजकीय पक्षासाठी ही कंपनी काम करत असल्याचे या कलाकारांना सांगितले. निवडणूक तोंडावर असल्याने सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन करण्याची मागणी केली. या मोबदल्यात कलाकारांना प्रत्येक महिन्यात पैसे मिळणार असल्याचे सांगितले. हे पैसे रोख स्वरूपात किंवा इतर पद्धतीने देण्यात येणार असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या तोडांवर पैसे कमवण्याची ही संधी कलाकारांनीही सोडली नाही. पैसे कोणत्याही स्वरूपात असो मग ते ब्लॅक मनीही स्विकारण्याची तयारी कलाकारांनी दाखवली. याचे व्हिडिओ काढण्यात आले.

- Advertisement -

या कलाकारांनी दाखवली तयारी

बॉलिवूड आणि टीव्ही मालिकेतील कलाकारांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी पैसे घेण्याची तयारी दाखवली आहे. यामध्ये महिमा चौधरी, दलेर मेहंदी, शक्ती कपूर, जॅकी श्रॉफ, राखी सावंत, अमिषा पटेल, श्रेयस तळपडे, पूनम पांडे, विवेक ओबेरॉय आणि अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

पूनम पांडे 

 नेहेमी आपल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असलेली मॉडेल पूनम पांडेचा व्हिडिओ समोर आला. पूनमच्या हॉट फोटोमुळे सोशल मीडियाचवर तिच्या फॉलोअर्सची संख्या जास्त आहे. “तुम्ही मला तिच युक्ती सांगितली जी माझ्या डोक्यात होती.” असे ती म्हणाली.

- Advertisement -

महिमा चौधरी

 


नव्वदच्या दक्षकात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री महिमा चौधरीने सत्ताधारी पक्षाला एक कोटी रुपये देणे मोठी गोष्ट नसल्याचे म्हटले आहे. “तुम्ही खोट बोलवून घेत आहात, प्रशंसा करून घेत आहात येवढ तर तुम्ही देऊच शकतात.” असे महिमा म्हणाली.

श्रेयस तळपडे

 


मराठी चित्रपट आणि बॉलिवूडमधली कलाकार श्रेयस तळपडे यानीही पैसे घेण्यास तयारी दाखवली आहे.”कितीवेळेनंतर मल ट्विटर करणे आवश्यक आहे?. कॅशमध्ये मला काही प्रॉबलेम नाही.” – श्रेयस तळपडे

विवेक ओबेरॉय

 


विवेक ओबेरॉय मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपटात भुमिका साकारणार आहे. विवेकनेही प्रचारासाठी पैसे घेण्याची तयारी दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -