घरदेश-विदेशव्हिडिओ वायरल, हजारों डायनामाइटने काही सेकंदात उडवला ट्रम्प यांचा ३४ मजली प्लाझा

व्हिडिओ वायरल, हजारों डायनामाइटने काही सेकंदात उडवला ट्रम्प यांचा ३४ मजली प्लाझा

Subscribe

अमेरिकेतील अटलांटिक शहरातील हा ३४ मजली प्लाझा ३ हजार डायनामाइट लावून पाडण्यात आला. हा प्लाझा कसीनोसाठी फेमस होता. व अनेक हॉलिवूड सिनेमात हा दाखवण्यात आला होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लाझा हजारो डायनामाइटच्या मदतीने पाडण्याच आला आहे. हा प्लाझा १९८४ मध्ये बांधण्यात आला होता व २०१४ मध्ये याला बंद करण्यात आले होते. ३ हजार डायनामाइट लावून ३४ मजल्यांची ही इमारत पाडताना बघण्यासाठी तशी खास व्यवस्थाही करण्यात आली होती. जेव्हा ही इमारत पाडण्यात आली तेव्हा तिथे शेकडो लोक उपस्थित होते. इतकंच नाही तर याचे लाईव्ह स्ट्रिमिंगही करण्यात आले होते. हा प्लाझा पाडतानाचा व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. विशेष म्हणजे ३४ मजल्यांचीही विशाल इमारत पाडण्यासाठी २० मिनिटांपेक्षाही कमी वेळ लागला.

- Advertisement -

बुधवारी सकाळी ९ वाजता एकापाठी एक विस्फोटानंतर ही इमारत पाडण्यात आली.अमेरिकेच्या अटलांटिक शहरातील हा प्लाझा आपल्या कसीनोसाठी लोकप्रिय होता. वादळामुळे ह्या इमारतीचा बाहेरील भाग हा खराब झाला होता. त्यामुळे गेल्यावर्षी जूनमध्ये अटलांटिक शहराच्या मेअर मार्टी स्मॉलने ही इमारत पाडण्याचा आदेश दिला होता. मेअर यांच्या म्हण्यानुसार. इमारत पडल्यानंतर याचा मलबा ८ मजली इमारती एवढा आहे असून तो हटवण्यासाठी जून पर्यंतचा वेळ लागेल. अमेरिकेच्या अटलांटिक शहरातील हा प्लाझा आपल्या कसीनोसाठी लोकप्रिय होता.

ट्रम्प स्वत: काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसले आहेत व त्यांचा हा प्लाझा ही अनेक सिनेमात दिसला आहे. ओशन ११ सिनेमाचं शूटींग ट्रम्प प्लाझामध्ये करण्यात आलं आहे. १९८४ ते १९९१ पर्यंत या कसीनोचे इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या बर्न डिल्लन म्हणाले, “ज्याप्रकारे ट्रम्प प्लाझा आणि अटलांटिक सिटीला जगसमोर ठेवलं तो क्षण अविश्वसनिय होता”. या प्लाझामध्ये पॉप सुपरस्टार मेडोनापासून ते रेसलर हल्क होगन, म्युझिक लिजंड कीथ रिचर्ड्स, अभिनेता जॅक निकलसनसारखे लोकही येऊन गेलेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -