घरदेश-विदेशसौदी अरेबियात तेल कंपनीच्या केंद्रांवर ड्रोन हल्ला

सौदी अरेबियात तेल कंपनीच्या केंद्रांवर ड्रोन हल्ला

Subscribe

सौदी अरेबियातील अरामको या ख्यातनाम तेल कंपनीच्या दोन फॅसिलिटी केंद्रांवर शनिवारी सकाळी ड्रोन हल्ला झाला. त्यामुळे या दोन्ही केंद्रावर मोठी आग लागली होती. यासंदर्भात सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे. सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ‘सकाळी चार वाजेच्या सुमारास अबकेक आणि खुराइस येथील फॅसिलीटी सेंटर्सवर ड्रोन हल्ला झाला. औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले’, अशी माहिती अरेबियाच्या गृहमंत्रालयाने निवेदनात दिली आहे. दरम्यान, दोन्ही केंद्रावर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

याअगोदरही झाला होता हल्ला

अरोमकोच्या फॅसिलिटी केंद्रांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. हा हल्ला नेमका कुणी केला? आणि तो कसा केला? याचा संपूर्ण तपास सुरु आहे. गेल्या महिन्यातही अरामकोच्या नॅचरल गॅसच्या फॅसिलिटी सेंटरवर हल्ला झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी येमेन येथील हूथी या विद्रोही संघटनेने घेतली होती. मात्र, शनिवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अध्याप तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.

- Advertisement -


हेही वाचा – कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या स्कायवॉकला भीषण आग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -