घरक्राइमDSP Shrestha Thakur: यूपीच्या दबंग लेडीची फसवणूक; भामट्याने IRS असल्याचं भासवत केलं...

DSP Shrestha Thakur: यूपीच्या दबंग लेडीची फसवणूक; भामट्याने IRS असल्याचं भासवत केलं लग्न, अन्….

Subscribe

युपीच्या 'लेडी सिंघम' डीएसपी श्रेष्ठा ठाकूर सध्या चर्चेत आहेत. त्यांनी त्यांचा माजी पती रोहित राजवर फसवणुकीचा आरोप करत FIR दाखल केला आहे. पोलिसांनी रोहितला अटक केली आहे.

लखनऊ: युपीच्या ‘लेडी सिंघम’ डीएसपी श्रेष्ठा ठाकूर सध्या चर्चेत आहेत. त्यांनी त्यांचा माजी पती रोहित राजवर फसवणुकीचा आरोप करत FIR दाखल केला आहे. पोलिसांनी रोहितला अटक केली आहे. तक्रारीनुसार, रोहितने IRS अधिकारी बनून सहा वर्षांपूर्वी मॅट्रिमोनियल साइटद्वारे श्रेष्ठा ठाकूर यांच्यासोबत लग्न केले होते. (DSP ShreStha Thakur Cheating UP s Domineering Lady Bhamtya pretended to be the IRS and)

आपल्या पतीने आपल्या फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतरही श्रेष्ठा ठाकूर लग्न वाचवण्यासाठी गप्प राहिल्या. पण, रोहित मात्र त्यांच्या नावावर फसवणूक करत होता, लोकांकडून पैसे उकळत होता, हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्याला घटस्फोट दिला. तरीही रोहितच्या कारवाया थांबल्या नाहीत. त्यामुळे श्रेष्ठा ठाकूर यांनी गाझियाबादच्या कौशांबी पोलीस ठाण्यात माजी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यावर पोलिसांनी काल त्याला अटक करून कारागृहात रवानगी केली.

- Advertisement -

2018 मध्ये लग्न झाले, दोन वर्षांनी घटस्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, डीएसपी श्रेष्ठा ठाकूर यांचे लग्न 2018 मध्ये एका मॅट्रिमोनियल साइटद्वारे झाले होते. श्रेष्ठा यांनी रोहित राज नावाच्या 2008 बॅचच्या IRS अधिकाऱ्याशी लग्न केले. मात्र नंतर त्यांना रोहितची ही ओळख खोटी असून रोहित त्यांच्या नावावर लोकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले. याला कंटाळून डीएसपी श्रेष्ठा ठाकूर यांनी लग्नाच्या दोन वर्षांनी पती रोहित राज याला घटस्फोट दिला.

मात्र, असे असतानाही या भामट्याने आपले कृत्य सोडले नाही. महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती असलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांची फसवणूक सुरू केली. सध्या तो गाझियाबादच्या कौशांबी पोलीस स्टेशन परिसरात राहत होता. त्याच्याकडून सातत्याने लोकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने नाराज होऊन श्रेष्ठा ठाकूर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी रोहित राजविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

- Advertisement -

रोहितचा प्ल‌ॅन असा झाला यशस्वी?

वास्तविक, 2008 साली रोहित राज नावाच्या आणखी एका व्यक्तीची IRS साठी निवड झाली होती. ते रांचीमध्ये तैनात होते. पण हा रोहित तो रोहित नव्हता ज्याच्याशी डीएसपीचे लग्न झाले होते. दोघांच्या नावातच साम्य होते. यामुळे सर्व काही बिघडले.

लग्न वाचवण्यासाठी श्रेष्ठा ठाकूर यांनी कडू घोट पिण्याचा प्रयत्न केला होता. पण पतीची फसवणूक करण्याची सवय वाढली. त्यांच्या नावावर त्याने इतर लोकांची फसवणूकही सुरू केली. अशा स्थितीत श्रेष्ठा ठाकूर यांनी वैतागून पोलिसांत तक्रार दाखल केली.

कोण आहेत श्रेष्ठा ठाकूर?

श्रेष्ठा ठाकूर या उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 2012 मध्ये त्यांनी UPPSC परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या डीएसपी झाल्या. लवकरच त्यांची राज्यातील प्रसिद्ध पोलीस अधिकाऱ्यांमध्ये गणना होऊ लागली. श्रेष्ठा ठाकूर सध्या शामली जिल्ह्यात तैनात आहेत.

2017 मध्ये त्यांना बुलंदशहर जिल्ह्यात सर्कल ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यावेळी रस्त्याच्या मधोमध त्यांच्या एका कार्यकर्त्यासोबत चालान देण्यावरून जोरदार वादावादी झाली. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. नंतर त्यांची नेपाळ सीमेजवळील बहराइच जिल्ह्यात बदली करण्यात आली. यावर श्रेष्ठा ठाकूर यांनी फेसबुकवर पोस्ट केली होती- जहाँ भी जायेगा रौशनी लुटाएगा.. किसी चराग का अपना मकां नहीं होता…

पोलीस अधिकारी बनण्याची रंजक कहाणी

श्रेष्ठा ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार- त्या कानपूरमध्ये शिकत होत्या. त्यावेळी बदमाशांनी अनेकदा मुलींची छेड काढली. अशा घटना अनेक मुलींसोबत घडल्या आहेत. त्यावेळी श्रेष्ठा यांनी पोलिसांत तक्रार केली होती, मात्र त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. यानंतर त्यांनी स्वत: पोलीस अधिकारी व्हायचे ठरवले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. यामुळे त्या 2012 मध्ये यूपी पीसीएस परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. यानंतर त्या डीएसपी झाल्या.

(हेही वाचा: Ram Mandir: अयोध्येला जाणारी ‘आस्था स्पेशल’ ट्रेनही सुरक्षित नाही; गुजरातमध्ये समाजकंटकांकडून दगडफेक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -