घरदेश-विदेशपीएनबीनंतर आता स्टर्लिंग घोटाळ्याचं भूत! १४ हजार ५०० कोटींचा घोटाळा!

पीएनबीनंतर आता स्टर्लिंग घोटाळ्याचं भूत! १४ हजार ५०० कोटींचा घोटाळा!

Subscribe

पीएनबी बँक घोटाळ्यानंतर देशात अजून एक मोठा घोटाळा उघड झाला असून स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडने बनावट कंपन्यांच्या नावाने भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घातल्याचं स्पष्ट झालं आहे.

विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी या यादीमध्ये आता नव्या घोटाळ्याची भर पडली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ११ हजार ४०० कोटींच्या घोटाळ्याने देशात खळबळ उडाली होती. मात्र, आता स्टर्लिंग बायोटेकच्या रुपाने पीएनबीपेक्षाही मोठा घोटाळा उघड झाला आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने देशभरात स्टर्लिंग बायोटेकच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये स्टर्लिंग बायोटेतकची तब्बल ९ हजार कोटींपेक्षाही जास्त मूल्य असलेली मालमत्ता आणि संपत्ती ईडीनं जप्त केली आहे.

- Advertisement -

कशी केली स्टर्लिंगनं लूट?

२०१७च्या ऑक्टोबर महिन्यातच ईडीने स्टर्लिंग बायोटेकच्या संदेसरा समूहावर एफआयआर करून खटला दाखल केला होता. मात्र, तेव्हा फत् ५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा खटला दाखल केला होता. मात्र, आता ईडीनं या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता हा आकडा थेट १४ हजार ५०० कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळेच स्टर्लिंगच्या ९ हजार कोटींहून जास्त मूल्य असलेल्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. स्टर्लिंग बायोटेक आणि संदेसरा समूहाचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांना बनावट कंपन्या तयार करून त्यांच्या नावे अनेक भारतीय बँकांकडून मोठ्या रकांची कर्ज घेतली आणि या बँकांना १४ हजार ५०० कोटींचा गंडा घातल्याची बाब ईडीच्या तपासात समोर आली आहे.


हेही वाचा – मेहुल चोक्सीला भारताकडे सोपवण्यासाठी अँटिग्वा सरकाने दिला नकार

कोणत्या बँकांना फसवलं?

यावेळी ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कंपनीच्या मालकीच्या असलेल्या नायजेरियातील ऑईल रिग, जहाज, विमान याशिवाय लंडनमधल्याही काही संपत्तीचा समावेश आहे. स्टर्लिंगच्या संदेसरा समूहाने भारतातल्या आंध्रा बँक, यूको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँक, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाकडून ही कर्ज घेतली होती. पण आता ही सगळी कर्ज बनावट कंपन्यांच्या नावे घेतल्याचं समोर आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -