घरदेश-विदेशधक्कादायक! जमिनीसाठी रक्तरंजित संघर्ष; वृद्धाला जबर मारहाण करून केली हत्या

धक्कादायक! जमिनीसाठी रक्तरंजित संघर्ष; वृद्धाला जबर मारहाण करून केली हत्या

Subscribe

ही हत्या करणारा मुख्य आरोपीही पोलिस कोठडीत आहे. प्राणघातक हल्ल्यात सामील असलेल्या इतरांना अटक करून चौकशी सुरूच आहे.

जमिनीच्या वादातून एका वृद्ध व्यक्तीला लाठी-काठीने जबर मारहाण करण्यात आली असून नंतर त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या चोलापूर पोलिस ठाण्यात परिसरात घडली असून तेथे एकच खळबळ उडाली आहे, जमिनीच्या वादात एका वृद्ध व्यक्तीला लाठी-काठीने मारहाण करण्यात आल्याने या घटनेत दोन लोकं गंभीर जखमी झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही लोकांना अटक केली तर उर्वरित लोकांचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे.

असा घडला प्रकार

वाराणसीच्या चोलापूर पोलीस स्टेशन परिसरातील दोन लोकांमधील जमिनीतील वाद हा रक्तरंजित संघर्षात रूपांतरित होईल, याची कोणालाही कल्पना नव्हती, परंतु हा प्रकार मंगळवारी सकाळी हाजीपूर गावात जमीन हडपण्यावरून काही लोकांमध्ये घडला. हा साधा वाद वाढून त्याचे मारामारीत रूपांतरित झाले आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या रक्तरंजित संघर्षात साधारण ६५ वर्षीय रामदुलर यादव ठार झाले, तर एका महिलेसह एक माणूस गंभीर जखमी झाला आहे. त्यांना या गंभीर अवस्थेत बीएचयूच्या ट्रॉमा सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जमिनीचा जुना वाद सुरू होता, या भांडणांत एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तर काही जखमींना बीएचयूच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ही हत्या करणारा मुख्य आरोपीही पोलिस कोठडीत आहे. प्राणघातक हल्ल्यात सामील असलेल्या इतरांना अटक करून चौकशी सुरूच आहे. कोणत्या परिस्थितीत वृद्धाचा मृत्यू झाला याचा तपासही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


Corona in India: चिंता कायम! बाधितांचा आकडा वाढता; दिवसभरात ८३,३४७ नवे रुग्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -