घरदेश-विदेशइंडिगो विमानाच्या इंजिन बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो विमानाच्या इंजिन बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

या घटनेत मंत्र्यासह १८० प्रवासी थोडक्यात बचावले असून कोणतीही जिवीत हानी झालेली नाही

इंडिगोचे विमान (6ई-336) गोव्या वरून दिल्लीच्या दिशेने रविवारी गोव्यातील डाबोलिम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने हे लँडिंग करण्यात आले आहे. या विमानाचे लँडिंग होण्यापुर्वी १५ मिनिट आधीच उड्डाण झाले होते. या विमानात गोव्याच्या एका मंत्र्यासह अधिकारी आणि १८० प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये गोव्याचे पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, कृषी संचालक आणि अधिकारी प्रवास करत होते. या घटनेत मंत्र्यासह १८० प्रवासी थोडक्यात बचावले असून कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा- तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

- Advertisement -

ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान गोव्याहून दिल्लीला उड्डाण करत होते. या विमानाचे उड्डाण झाल्यानंतर १५ मिनिटांनी लक्षात आले की, विमानातील इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळे तात्काळ या विमानाचे लँडिंग करण्यात आले. या घटनेनंतर इंडिगो एअरलाईन्सकडून कोणतीही माहिती देण्याच आली नाही. मात्र, विमानात झालेला तांत्रिक बिघाड वेळेत समजल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -