घरताज्या घडामोडीएक्स रोडीज निहारिका तिवारीला कन्हैयालालप्रमाणे जीवे मारण्याची धमकी

एक्स रोडीज निहारिका तिवारीला कन्हैयालालप्रमाणे जीवे मारण्याची धमकी

Subscribe

रोडीज या लोकप्रिय शोची कंटेस्टंट निहारिका तिवारी हिला उदयपूर येथील कन्हैयालाल प्रमाणे गळा चिरुन ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

0 कन्हैयालाल हत्याकांडानंतर निहारिका हीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तिने कन्हैयालाल हत्याकांडाचा निषेध केला होता. नंतर तिला इन्स्टाग्रामवर यूजर्सकडून धमक्या देण्यात आल्या आहेत.

निहारिका तिवारी ही छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यतील असून सध्या शूटींगसाठी ती इंडोनेशियात आहे. कन्हैयालालची हत्या ही निंदनीय घटना आहे. म्हणूनच मी त्यावर बोलले. मी काहीही चुकीचे बोलले नसून नुपूर शर्माचे समर्थनही केलेले नाही. फक्त कन्हैयालालच्या हत्येचा निषेध केल्याचे निहारिकाने म्हटले आहे. निहारिकाने व्हिडीओमध्ये दिवसाढवळ्या हत्या होत असून आमच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. हे बरोबर आहे का असा सवाल केला होता. आम्ही हिंदू शिवाचे नाव घेऊन कोणाचे गळे कापत नाही. कोणा हिंदूने भगवान शिवाचे नाव घेऊन कोणाचा खून केल्याचे कधी ऐकलेही नाहीये. पण जर आमच्या शिवलिंगावर टिका करण्यात आली तर राग येणारच. नुपूरला निलंबित करण्यात आले पण त्यांच काय ज्यांनी भगवान शिवाबद्दल चुकीचे विधान केले. असा सवाल निहारिका हिने व्हिडीओमध्ये केला होता. तसेच मी कोणालाही घाबरत नाही ज्याला जे बोलायचे आहे ते बोलू द्या असेही तिने म्हटले आहे.

- Advertisement -

मात्र त्यानंतर तिला इन्स्टाग्रामवर धमक्या देण्यात येत आहेत. आता तुझे काही खऱे नाही. कन्हैयालाल प्रमाणे तुझाही गळा कापून हत्या केली जाणार. तर काहीजणांनी तूला चार जण खांद्यावर नेणार अशाही धमक्या दिल्या. तर काहीजणांनी तिच्या हिंमतीला दाद दिली असून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisement -

00000000

तर दुसरीकडे नुपूर शर्माचे समर्थन केल्याने कुम्हारी येथील एका २२ वर्षाच्या तरुणालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचे नेते गौरीशंकर श्रीवास्तव यांनी ज्या लोकांना उदयपूर सारख्याच घटनेची पुन्हा पुनर्रावृत्ती होईल असे वाटत असेल त्यांनी तसे समजू नये असे म्हटले आहे. तसेच भाजपचा प्रत्येक कार्यकरत्ा धमकी मिळणाऱ्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी समर्थ असल्याचे म्हटले आहे.

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -