घरदेश-विदेशनव्या पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी - परराष्ट्र मंत्रालय

नव्या पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करावी – परराष्ट्र मंत्रालय

Subscribe

भारतातून विदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारतात लवकरच प्रत्यार्पण होणार, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार म्हणाले आहेत.

‘पाकिस्तान जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची पाठराखण करत आहे’, असे भारतीय परराष्ट्रीय मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पाकिस्तानने ४७ दहशतवाद्यांना अटक केल्याचे सांगितले आहे. ही बाब सांगताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हटले की, ‘हा नवा पाकिस्तान आहे. हा पाकिस्तान दहशतवादाला थारा देणार नाही.’ परंतु, ‘पाकिस्तान खोटं बोलत आहे’, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. ‘पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांची तळे आहेत. तिथे पाकिस्तानकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही. त्यामुळे या नव्या पाकिस्तानने दहशतवाद्यांनी कारवाई करावी’, असे रविश कुमार म्हणाले आहेत. यासोबतच नीरव मोदीचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होणार, अशी माहिती त्यांनी दिली आहे. शनिवारी सकाळी परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रविश कुमार यांना नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी नीरव मोदीला भारत लवकरच नीरव मोदीला आणणार असे सांगितले.

‘पाकिस्तान अत्यंत खोटारडे’

रविश कुमार म्हणतात की, ‘पाकिस्तान अत्यंत खोटारडे आहे. त्यांचा खोटारडापणा भरपूर वेळा दिसून आला आहे. मुंबई हल्ल्यावेळीही पाकिस्तान खोटं बोललं होतं. आतादेखील पाकिस्तान खोटंच बोलत आहे. भारताच्या हवाई दलाच्या दोन विमानांना पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. परंतु, भारताच्या एफ १६ या विमानाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विमानाचं नुकसान झालेलं नाही. भारताने एक विमान गमावलं आहे. भारताचं दुसरं विमान पाडल्याचा पाकचा खोटा दावा आहे. पाकिस्तान दहशतवादाची पाठराखण करत आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. पाकिस्तानमध्ये अजूनही दहशतवादी अड्डे आहेत.’

- Advertisement -

नीरव मोदीला लवकरच भारतात आणणार

या पत्रकार परिषदेत नीरव मोदीच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रविश कुमार म्हणाले की, नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण व्हावे यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. नीरव मोदी लंडनमध्य आहे, अशी माहिती मिळत आहे. भारताने प्रत्यार्पणाचा प्रस्ताव इग्लंडकडे पाठवला आहे. इग्लंडच्या उत्तराची भारत वाट पाहत आहे. नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -