घरदेश-विदेशफेसबुकने वाचवले 'तिचे' प्राण

फेसबुकने वाचवले ‘तिचे’ प्राण

Subscribe

आपली मुलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काय करतात, हे पालकांनी पाहणे महत्त्वाचे आहे. दिवसभर कामात व्यग्र असलेले पालक मुलांना चांगल्या सोयीसुविधा पुरविण्याच्या मागे असतात. त्यांना मोबाईल, टॅबलेट इंटरनेट सुविधा सगळे काही पुरवतात. पण त्यावर ते काय करतात हे पाहण्यासाठी पालकांकडे वेळ नसतो.

फेसबुक हल्ली सगळ्यांच्याच जीवनाचा इतका अविभाज्य भाग झाला आहे की, खऱ्या माणसांसोबत आपण जितके बोलत नाही तितके आपण फेसबुकवरुन अपडेट राहायला पसंती देत असतो. अशीच एक पोस्ट फेसबुकवर आली आणि पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी तातडीने या फेसबुक अकाऊंटवरील मुलीची माहिती काढली आणि तिचे प्राण वाचवले.

नेमकं प्रकरण काय?

एक मुलगी आत्महत्या करणार असल्याची माहिती फेसबुकच्या अमेरिकेतील मुख्यालयाने आसाम पोलिसांना २३ जुलैला दिली. हा अलर्ट दिल्यानंतर तातडीने आसाम पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला. आसाममधील गुवाहाटी परीसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आपल्या फेसबुक पोस्टमधून ‘आज मी आत्महत्या करणार ‘, अशी पोस्ट टाकली होती. ही पोस्ट पडताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने आसाम पोलिसांनी ही माहिती फेसबुकने दिली आणि या मुलीचे प्राण वाचवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

मुलीचे केले समुपदेशन

मुलीला शोधल्यानंतर तिची मानसिक परिस्थिती जाणून घेऊन तिचे समुपदेशन करण्यात आले. शिवाय तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समुपदेशनानंतर तिची फेसबुक पोस्ट काढून टाकण्यात आली आहे.

फेसबुकवर पोस्ट करुन आत्महत्या

सोशल मीडियाचा वापर अपडेट करण्यासाठी केला जातो. पण हल्ली सर्रास स्वत:च्या आत्महत्येसंदर्भातल्या पोस्ट देखील फेसबुकवर पडतात. आतापर्यंत देशभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ही वाढती मानसिकता लक्षात घेत आता फेसबुकनेच आता अधिक अलर्ट झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

पालकांनी लक्ष देण्याची गरज

आपली मुलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काय करतात, हे पालकांनी पाहणे महत्त्वाचे आहे. दिवसभर कामात व्यग्र असलेले पालक मुलांना चांगल्या सोयीसुविधा पुरविण्याच्या मागे असतात. त्यांना मोबाईल, टॅबलेट इंटरनेट सुविधा सगळे काही पुरवतात. पण त्यावर ते काय करतात हे पाहण्यासाठी पालकांकडे वेळ नसतो. साहजिकच त्यांची मानसिकस्थिती काय हे जाणून घ्यायला वेळ नसतो. त्यामुळेच अशा पद्धतीने मुले सोशल मीडियाला सगळ्यात जवळचा मानतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -