घरदेश-विदेशयूजर्सना विश्वसनीय बातमी देण्यासाठी फेसबुकचे 'न्यूज टॅब'

यूजर्सना विश्वसनीय बातमी देण्यासाठी फेसबुकचे ‘न्यूज टॅब’

Subscribe

माथियास डॉफरन आणि जर्मनीचे मीडिया दिग्गज एक्सल स्प्रिंगर यांच्या सोबत 'तंत्रज्ञान आणि समाजाचे भविष्य' या विषयी व्हिडिओ चर्चेमध्ये बोलत असताना मार्क झुकरबर्ग यांनी 'न्यूज टॅब' बद्दल माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर कोणती बातमी खरी आणि कोणती बातमी खोटी आहे? हे समजणे यूजर्सना खूप कठीण जाते. तसेच एखादी बातमी फेक असूनही ती बातमी यूजर्सकडून अनेकांपर्यंत पोहचवली जाते. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजसंबंधीत एका व्हिडिओ चर्चेमध्ये बरीच चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर जगातील सोशल मीडियामध्ये सर्वाधीक वापरल्या जाणऱ्या फेसबुकने अशा फेक न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजना केल्या. मात्र, फेसबुक स्वत:च एका ‘न्यूज टॅब’ सुरू करण्यावर काम करत आहे. मंगवाळ दि. २ एप्रिल रोजी फेसबुकचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी ‘न्यूज टॅब’ संबंधीत माहिती दिली. मार्क झुकरबर्ग म्हणाला की, ‘उच्च गुणवत्ता आणि विश्वसनीय’ पत्रकारितेला आर्थिक रुपात समर्थन देण्यासाठी फेसबुकच्या ‘न्यूज टॅब’चा वापर केला जाऊ शकतो.

उच्च गुणवत्ता आणि विश्वसनीय माहितीसाठी

माथियास डॉफरन आणि जर्मनीचे मीडिया दिग्गज एक्सल स्प्रिंगर यांच्या सोबत ‘तंत्रज्ञान आणि समाजाचे भविष्य’ या विषयी व्हिडिओ चर्चेमध्ये बोलत असताना मार्क झुकरबर्ग यांनी ‘न्यूज टॅब’ बद्दल माहिती दिली. तसेच विश्वसनीय बातनीची अपेक्षा असणाऱ्या यूजर्सना ‘न्यूज टॅब’ सोईकर ठरणार आहे. तर या ‘न्यूज टॅब’चा उच्च गुणवत्ता आणि विश्वसनीय माहिती समोर आणण्यासाठी याचा वापर होईल असेही झुकरबर्ग यांनी मत व्यक्त केले आहे. तर फेसबुक यूजर्सपैंकी १० ते १५ टक्के यूजर्स या ‘न्यूज टॅब’मध्ये रूची असणारे आहेत, असेही झुकरबर्ग यांने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -