घरदेश-विदेशतिरंग्याचा अपमान करणाऱ्यांना अटक करा; पंतप्रधानांच्या वक्तव्यावर राकेश टिकैतांचा पलटवार

तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांना अटक करा; पंतप्रधानांच्या वक्तव्यावर राकेश टिकैतांचा पलटवार

Subscribe

७३ व्या 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला.

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारात तिरंग्याचा झालेला अपमान पाहून देश दु:खी झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये सांगितले. मोदींच्या या वक्तव्यावर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्याने कोणी तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घ्या, अशी प्रतिक्रिया टिकैत यांनी दिली आहे. सर्व देशवासीयांचे तिरंग्यावर प्रेम आहे. त्यामुळे तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी टिकैत यांनी केली. तिरंगा हा फक्त पंतप्रधानांचा नसून तो पूर्ण देशाचा आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना आणि आम्हालाही तिरंग्याबाबत आदर आणि प्रेम आहे. त्यामुळे तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी टीका टिकैत यांनी केली आहे.

सरकारशी चर्चा बंदूकीच्या धाकाने किंवा कोणत्याही दबावाखाली होणार नसल्याचे टिकैत यांनी स्पष्ट केले. बंदूकीच्या धाकाने कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतो. या मुद्द्यावर योग्य तो तोडगा निघावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, कोणताही धाक किंवा दबावाखाली ही चर्चा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही चर्चेला तयार आहोत, मात्र, चर्चेसाठी सरकारने कोणत्याही अटी ठेवू नयेत, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आणि आपल्यामध्ये फक्त एका कॉलचे अंतर आहे, असे सांगत आपण चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते. पंतप्रधानांनी दोन महिन्यांनंतर या मुद्द्यावर मौन सोडत वक्तव्य केले होते. शेतकऱ्यांसोबत चर्चेची सरकारची तयारी असल्याचेही ते म्हणाले होते. त्यावर कोणत्याही दडपणाखाली सरकारशी चर्चा करणार नसल्याचे टिकैत यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

रविवारी 73व्या ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. लाल किल्ल्यावर झालेला तिरंग्याच्या अपमानाने संपूर्ण देश दु:खी असल्याचं मोदी म्हणाले. 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर ज्याठिकाणी पंतप्रधान दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला झेंडा फडकवतात त्याठिकाणी, निशान साहिब यांचा झेंडा फडकवला होता. दरम्यान केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या ६० हून अधिक दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन सुरु आहे. यातच २६ जानेवारी रोजी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होत. मात्र या मोर्चाने हिंसक वळण घेतले. मात्र या आंदोलनानंतर देशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -