घरदेश-विदेशकनिका कपूर हॉस्पिटलमधून पळून जाण्याची भीती

कनिका कपूर हॉस्पिटलमधून पळून जाण्याची भीती

Subscribe

सध्या कनिकावर संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार सुरू आहेत. इस्पितळाचे डायरेक्टर आर.के. धीमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. पण कनिकाचे नखरे काही थांबत नाहीत. धीमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिकाला इस्पितळातील सर्वोत्तम रुम दिल्यानंतरही ती इस्पितळाला हवे ते सहकार्य करत नाही. यामुळेच ती कदाचित पळून जाईल अशी भीती इस्पितळातील डॉक्टरांना वाटत आहे. असे केल्यास करोना विषाणू अजून पसरण्याची शक्यता निर्माण होते. याचमुळे इस्पितळाच्या अधिकार्‍यांनी तिच्यासाठी एक अधिकचा सुरक्षा रक्षक नेमला आहे.

डायरेक्टर धीमन यांनी कनिकाच्या सुविधा आणि डाएटबद्दल बोलताना सांगितलं की, कनिकाला एका इस्पितळात जेवढ्या सुविधा मिळाल्या पाहिजे तेवढ्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत. आता एक रुग्ण म्हणून तिने सहकार्य करणे अपेक्षित आहे. तिला इस्पितळातील किचनमधून ग्लूटेन फ्री डाएट दिलं जात आहे. आता तिने आम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. तरच ती ठीक होऊ शकेल.

- Advertisement -

‘कनिकाला ज्या सुविधा देण्यात आल्या आहेत त्यात आयसोलेटेड खोली, त्यात एक टॉयलेट, बेड आणि टीव्ही आहे. तिच्या रूमला एसीची हवा देण्यात आली आहे. ज्याचं एअर हँडलिंग युनिट इतर करोना विषाणू युनिटहून वेगळे आहे. तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवलं जात आहे. आता तिला एक रुग्ण म्हणून वागायला हवे.

चोराच्या उलट्या बोंबा
इस्पितळात माझी मदत करण्याऐवजी मला धमकावलं जात आहे. मी क्वॉरनटाइनमध्ये आहे. अशावेळी रुग्णाला धमकावलं जाऊ नये. कोणाला काहीही बोलणार का? या सगळ्या अफवा आहेत. भारतात विमानतळावर होणार्‍या चाचण्यांपासून मी कशी पळू शकते. मी शिक्षित आहे. मी फार मेहनत घेते आणि मला माहीत नाही या सर्व गोष्टी कोण पसरवत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -