घरदेश-विदेश'गणपती'बद्दल दिग्दर्शकाचे वादग्रस्त विधान; गुन्हा दाखल

‘गणपती’बद्दल दिग्दर्शकाचे वादग्रस्त विधान; गुन्हा दाखल

Subscribe

दक्षिणेतील दिग्दर्शक भारतीराजा यांच्याविरोधात लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपतीबद्दल भारतीराजा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने हिंदू मकाल मन्नानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील दिग्दर्शक भारतीराजा यांच्या विरोधात लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेन्नई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिंदू मकाल मन्नानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर भारतीराजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७६ वर्षीय भारतीराजा यांनी गणपतीबद्दल ‘इपोर्डेट गॉड’ असे वादग्रस्त विधान केले होते. भारतीराजा यांच्या वादग्रस्त विधानाची ही काही पहिली वेळ नाही आहे. यापूर्वी देखील भारतीराजा यांनी अशाच प्रकारचे वादग्रस्त विधान केले होते. शिवाय, यापूर्वीच्या प्रकरणामध्ये भारतीराजा यांना अटकपूर्व जामीन देखील मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर देखील त्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे.

पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

भारतीराजा यांना गणपतीबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानंतर हिंदू मकाल मन्नानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी कावेरी पाणी प्रश्नावरून देखील भारतीराजा यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -