घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात आजपासून प्लास्टिकबंदी लागू

महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिकबंदी लागू

Subscribe

आजपासून प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर सरकाने दंडात्मक कारवाईला करण्या निर्णय घेतला आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी राज्यसरकाने मुंबईसह संपूर्ण राज्यभरात आजपासून प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर सरकाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास ५ हजार दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार व तीन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. प्रथम ही कारवाई व्यापारी आणि कारखाने यांच्यावर होणार असून सामान्य नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार असल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले आहे.

प्लास्टिकबंदी पालिकेच्या संकलन कार्यात करा जमा

महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्यासाठी राज्य सरकाने एक पाऊल पुढे टाकले आहे. आजपासून प्लास्टिकबंदी करण्यात आली असल्याने ज्या सामान्य नागरिकांकडे प्लास्टिकचा साठा आहे त्या नागरिकांनी ते प्लास्टिक पालिकेच्या संकलन कार्यालयात जमा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. याकरता पालिकेने मुंबईमध्ये एकूण ३७ संकलन केंद्र सुरु केली आहेत. तर ओला आणि सुका कचरा संकलन केंद्रात देखील प्लास्टिक जमा करण्यासाठी परवानगी दिली आहे.

- Advertisement -

या प्लास्टिकवर बंदी

थर्माकोलची प्लेट, ग्लास, डेकोराशन, चमचे, ताट, वाट्या, चहाचे कप, सरबत ग्लास, थर्माकोल प्लेट, सजावटीसाठी वापरण्यात येणारे थर्माकोल, हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिकचे डबे, फरसाण यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक यावर बंदी घालण्यात आली आहे.

यावर प्लासिटबंदी नाही

दुधाच्या पिशव्या ५० मायक्रॉनवरील, प्लासिटक पेन, रेनकोट, रुग्णालयामध्ये वापरण्यात येणारी उपकरणे, टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लासिटक आवरण, अन्नधान्या साठवण करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लासिटक यावर कारवाई केली जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -