घरदेश-विदेशकॅन्सर झाल्याने न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर उपचार सुरु

कॅन्सर झाल्याने न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर उपचार सुरु

Subscribe

मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार करदाते आणि शेतकरी यांना खूश करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. उपचारासाठी अरुण जेटली न्यूयॉर्कला गेले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जेटलींना मांडीतील पेशींचा कॅन्सर झाला आहे. अरुण जेटलींना अशा काळात उपचारासाठी जावे लागले आहे ज्यावेळी अर्थसंकल्पिय अधिवेशनाची जोरदार तयारी सुरु आहे. हा मोदी सरकारच्या काळातला शेवटता अर्थसंकल्प असणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारीला अरुण जेटली यांना अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होत आहे. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना देखील स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

कॅन्सरचे झाल्याचे निदान

६६ वर्षाचे अरुण जेटली यांच्यावर मागच्या वर्षी १४ मे रोजी एम्स हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. रविवारी ते कॅनडाला रवाना झाले त्यावेळी असे म्हटले जात होते की, ते किडीनीच्या संबंधीत उपचारासाठी गेले आहेत. त्यांना आता कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. ज्यावेळी अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यावेळी ते उपचार घेऊन परत येईपर्यंत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी कार्यभार संभाळला होता.

- Advertisement -

अर्थसंकल्प कोण सादर करणार?

मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार करदाते आणि शेतकरी यांना खूश करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. मात्र आता अरुण जेटली यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. तसंच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन लगेच डिस्चार्ज देणं हॉस्पिटलला शक्य नाही. दरम्यान, अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -