घरताज्या घडामोडीमेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 9 जणांचा मृत्यू

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार, 9 जणांचा मृत्यू

Subscribe

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मेक्सिकोमधील बारमध्ये गोळीबार झाला असून, यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही जण गंभीर जखमी असल्याचे समजते.

मेक्सिकोमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मेक्सिकोमधील बारमध्ये गोळीबार झाला असून, यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही जण गंभीर जखमी असल्याचे समजते. मेक्सिकोमधील गुआनाजुआतोमध्ये हा गोळीबार झाला आहे. (Firing In Bar At Central Mexican State 9 Dead Gang War Suspected)

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारात 2 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमधील हिंसाचारात वाढ झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. याच हिंसाचारात वाढ झाल्याने हा गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मेक्सिकोमधील बारमध्ये झालेल्या या गोळीबारात 5 पुरुष आणि 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास एक टोळी बंदुक घेऊन बारमध्ये घुसल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी त्यांनी बारमध्ये असणाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. परंतु, अद्याप पोलिसांना हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. पोलिस आणि प्रशासन याप्रकरणी तपास करत असून त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी काही पोस्टर्सही आढळली आहेत.

- Advertisement -

सामुहिक गोळीबार

याआधीही मेक्सिकोमध्ये सामुहिक गोळीबार झाला होता. मेक्सिकोच्या मेक्सिकन सिटी हॉलमध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये हापौरांचाही समावेश होता.

मेक्सिकन सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा गोळीबार झाला होता. तिथल्या महापौरांशिवाय त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका पोलिसातील अनेक अधिकाऱ्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर गोळीबाराच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


हेही वाचा – आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू; सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -