घरCORONA UPDATECorona: निमलष्करी दलातील कोरोनाचा पहिला बळी; CRPF अधिकाऱ्याचा मृत्यू

Corona: निमलष्करी दलातील कोरोनाचा पहिला बळी; CRPF अधिकाऱ्याचा मृत्यू

Subscribe

भारताच्या निमलष्करी दलातील एका अधिकाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाचा संसर्ग आता देशातील जवानांचेही बळी घेऊ लागला आहे. भारताच्या निमलष्करी दलातील एका अधिकाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्याची ताजी माहिती समोर येत आहे. या दलातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू असून त्यामुळे निमलष्करी दलातही आता कोरोनाने शिरकाव केला आहे, असे यातून पाहायला मिळत आहे. मयुर विहार येथील सीआरपीएफमधील ३१ बटालियनमध्ये तैनात असलेल्या सब इंस्पेक्टरचा कोरोनाने बळी घेतला असून त्या अधिकाऱ्याचा सफदरजंगमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – CoronaVirus : धारावीतील महापालिका पाणी खात्याचे ७ कामगार कोरोनाबाधित

- Advertisement -

४६ सीआरपीएफ जवानांना कोरोना

या अधिकाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. सध्या सीआरपीएफमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ झाली आहे. त्या सर्व कोरोनाबाधितांना मंडोली येथील सरकारी केंद्रात क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनीही या अधिकाऱ्याच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले गृहमंत्री 

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून या अधिकाऱ्याला श्रद्धांजली अर्पित केली असून नमूद केले आहे की, या सब इंस्पेक्टरच्या नातलगांसोबत दोन दिवसांपूर्वीच माझे फोनवर बोलणे झाले होते. देशातील एक साहसी जवान गमावणे ही मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठी माझ्या मनात सहानुभूती आहे. केंद्र सरकार या दुःखद क्षणी त्यांच्यासोबत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -