घरदेश-विदेश१७५ कोटींच्या अंमलीपदार्थासह पाच पाकिस्तानी अटक

१७५ कोटींच्या अंमलीपदार्थासह पाच पाकिस्तानी अटक

Subscribe

गुजरात एटीएस, तटरक्षक दलाची कारवाई

गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाबरोबर केलेल्या कारवाईत पाच पाकिस्तानी नागरिकांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत तब्बल १७५ कोटी रुपयांच्या अंमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. गुजरातमधील कच्छ किनारपट्टीतील मध्य समुद्री भागात ही कारवाई करण्यात आली.

गुजरातच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणवर अंमलीपदार्थांची तस्करी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून भारतीय तटरक्षक दलास मिळाली होती. या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होण्यापासून रोखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. तसेच, १६०० किलोमीटरच्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यास सज्ज देखील आहोत.

- Advertisement -

गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाबरोबर राबवलेल्या संयुक्त कारवाईत पाच पाकिस्तानी नागरिकांना १७५ कोटी रुपयांच्या अंमलीपदार्थांसह अटक केली आहे, अशी माहिती गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -