घरदेश-विदेशएकाच मतदाराच्या नावे ५ Voting Card; निवडणूक अधिकाऱ्याचे निलंबन

एकाच मतदाराच्या नावे ५ Voting Card; निवडणूक अधिकाऱ्याचे निलंबन

Subscribe

केरळच्या कासरगोड जिल्ह्यातील उडुमा येथील Computer System मध्ये एकाच मतदार व्यक्तीच्या नावे पाच मतदान कार्ड असल्याचे आढळून आले. ऐन निवडणुकीच्या काळात या प्रकारामुळे केरळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या या गैर प्रकारानंतर सोमवारी एका निवडणूक अधिकाऱ्याला त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक अधिकारी टीका राम मीणा यांनी सांगितले की, उडुमा येथील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारीच्या Computer System मध्ये ६१ वर्षीय मतदार असणाऱ्या कुमारी यांच्या नावे ५ मतदान कार्ड (Voting Card) असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. निलंबन झाल्यानंतर त्यांनी असेही सांगितले की, या पाच मतदान कार्डपैकी चार कार्ड रद्द करण्यात आले होते आणि एकच कार्ड मतदाराच्या नावाने त्यांना देण्यात आले होते.

मतदार यादी तयार करण्याच्या अनियमिततेबद्दल विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी देखील आरोप केला. या केलेल्या आरोपांबद्दल ते म्हणाले, त्यांनी स्वतः चिन्हांकित केलेल्या अनेक मतदारांच्या नोंदींची सविस्तर तपासणी केली. यावेळी त्यांनी असे आढळले की तब्बल ५९० मतदार कार्ड एकसारखे असे बनावट आहेत. पुढे ते असेही म्हणाले की, एका मतदाराच्या नावे असणारे एकाहून अधिक मतदार कार्ड ही काही नवी गोष्ट नाही. तर कोणत्या न कोणत्या कारणांमुळे बर्‍याच राज्यात असे प्रकार उघड झाल्याचे निवडणुकीदरम्यान समोर आले आहे.

- Advertisement -

मुख्य निवडणूक अधिकारी मीणा यांनी असे सांगितले की, या प्रकणात कोणताही राजकीय हेतू किंवा कारण असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र असे बनावट मतदातन कार्ड मतदाराला देण्यात आले असले तर त्या अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मतदाराला मतदान कार्ड प्राप्त करण्यासाठी एक ऑनलाईन अर्ज करून ते मिळवता येते. मात्र काहीवेळा लोकं आपल्या चुकीने अनेकदा यासाठी अर्ज करून टाकतात. एकाच मतदाराकडे एकापेक्षा अधिक मतदान कार्ड असण्याचं कारण म्हणजे लोकं आपला मतदार संघ किंवा निवास्थान बदलत असल्याने नव्या पत्त्यावरून देखील मतदान कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत एका मतदाराकडे नवीन आणि जुन्या निवासस्थानाच्या पत्त्यावरील मतदान कार्ड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजून मतदान आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून १४० मतदार संघात कडक तपासणाचे आदेश देण्यात आले आहे.


जनतेचा खिसा रिकामा करत केंद्राने १० महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या करातून २ लाख कोटींचं केलं संकलन

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -