घरदेश-विदेशट्रक-बोलेरो अपघातात पाच कामगार ठार

ट्रक-बोलेरो अपघातात पाच कामगार ठार

Subscribe

विजयपूर नजीकच्या होनगनहळ्ळी येथे झालेल्या अपघातात पाच कामगार जागीच ठार झाले आहे.

कर्नाटक राज्यातील विजयपूर नजीकच्या होनगनहळ्ळी येथे मंगळवारी रात्री अपघात झाला. भरधाव ट्रकने बोलेरो गाडीस दिलेल्या जोरदार धडकेत पाच कामगार जागीच ठार झाले आहेत. या अपघातात ट्रक चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमके काय घडले?

विजयपूर नजीकच्या होनगनहळ्ळी येथे मंगळवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो जीपमधून सात कामगारांना कामावर नेण्यात येत होते. हे सर्व कामगार पुण्यातील आहेत. जखमींना जवळच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेले महाराष्ट्रातील नांदेड तेथील राज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे कर्मचारी असल्राची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. ते विजापूर-हुबळी रस्ता कामासाठी निघाले होते. हे सर्व कर्मचारी विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्रातील कोल्हार रेथे शेडमध्रे राहत होते. मंगळवारी सकाळी रस्ते कामाची एक मशीन बिघडलेली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी ही मशीन घेऊन ते विजापूरला आले होते. दुरुस्तीनंतर ते इतर कर्मचार्‍यांना जेवण आणण्यासाठी बोलेरोमधून जात असताना बागलकोटहून विजापूरकडे वाळू असलेल्रा ट्रकने त्यांच्या गाडीला समोरासमोर जोरदार धडक दिली आणि त्यांचा अपघात झाला.

- Advertisement -

वाचा – येवला – मनमाड मार्गावरील अपघातात ६ जणांचा मृत्यू

वाचा – सातारा : कार अपघातात डॉक्टर ठार; चार गंभीर जखमी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -