घरमहाराष्ट्रसातारा : कार अपघातात डॉक्टर ठार; चार गंभीर जखमी

सातारा : कार अपघातात डॉक्टर ठार; चार गंभीर जखमी

Subscribe

या अपघातातील मृत डॉ. घाटोळे हे पुण्यातील नामवंत हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांनी आजपर्यंत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. परंतु या अपघातामध्ये त्यांना प्राण गमवावा लागला.

पुणे-सातारा महामार्गावरील वेळेगावच्या हद्दीतील हॉटेल सेवन फिश समोरील रस्त्यावर कार चालकाचा मध्यरात्रीच्या सुमारास कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून महामार्गावर पलटी झाली. या अपघातात कारमधील युवराज घाटुळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा – हुबळी येथे बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; ६ जण ठार 

- Advertisement -

मृत डॉ. घाटोळे हे पुण्यातील नामवंत हृदयरोग तज्ञ

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण-सातारा महामार्गावरुन एमएच १२ के ई २८८५ मधून युवराज घाटुळे (३९) आकाश हुंडेकर (२३), स्वप्नील धुमाळ (२५), डॉ. हेमंत थोरात (२८), निलम थोरात (२६) असे पाच डॉक्टर पुण्याकडून साताऱ्याकडे येत होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वेळेगावच्या हद्दीतील सेवन फिश हॉटेल समोरील रस्त्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दोन रस्त्यामध्ये असणाऱ्या डिव्हायडरला जाऊन धडकली आणि जागेवर पलटी झाली. त्यामध्ये हृदयरोग तज्ञ डॉ. युवराज घाटोळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत डॉ. घाटोळे हे पुण्यातील नामवंत हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांनी आजपर्यंत शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. परंतु या अपघातामध्ये त्यांना प्राण गमवावा लागला. या अपघाताची नोंद भुईंज पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय अवघडे करीत आहेत.


हेही वाचा – तिने विमान अपघातात मृत्यू झालेल्या जोडीदाराशी केले लग्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -