घरदेश-विदेशबापरे! अफगाणिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांवर चक्क टॅक्सी चालवण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

बापरे! अफगाणिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांवर चक्क टॅक्सी चालवण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

Subscribe

प्रत्येकाच्या जीवनात चढ – उतार आणि अनिश्चित प्रसंग, घटना घडत असतात. या अनिश्चित जीवनावर आजवर अनेक सिद्धांत मांडले गेलेत. याच अनिश्चित जीवनाचा सामान करणारी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत असतात. यातचं एक उदाहरण म्हणजे मोहम्मद खालिद पाएंदा यांचे. काही महिन्यांपूर्वी ते अफगाणिस्तान देशाचे अर्थमंत्री पद सांभाळत होते, पण आज त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अमेरिकेत टॅक्सी चालवण्याची वेळ आली आहे.

कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी चालवावी लागतेय टॅक्सी

द वॉशिंग्टन पोस्टच्या अलीकडील अहवालानुसार, अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री मोहम्मद खालिद पाएंदा हे सध्या अमेरिकेत उबेर कॅब चालवत आहेत. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेण्यापूर्वी ते अर्थमंत्री होते. सत्तापालट होण्याच्या भीतीने त्यांनी अफगाणिस्तान सोडत अमेरिकेत स्थलांतर केले. अमेरिकेत आल्यानंतर त्यांनी जॉर्जटाउन विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून देखील काम केले, परंतु कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी पार्टटाईम Uber कॅब चालवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन डीसीमध्ये उबेर चालवणाऱ्या पाएंदाचे यांचे म्हणणे आहे की, त्यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याची संधी मिळाली आहे, ज्याला ते आपले भाग्य समजतात. ते म्हणाले की, सध्या माझ्याकडे सध्या हक्काची जागा नाही. ना मी अमेरिकाचा आहे, ना अफगाणिस्तानचा. आयुष्यात स्वत;कडे काहीच नाही अशी स्थिती आहे. Uber च्या कमाईबाबत ते सांगतात की, ‘जर मी पुढच्या 2 दिवसात 50 ट्रिप पूर्ण केल्या, तर मला 95 डॉलरचा बोनस मिळेल.’

अफगाणिस्तानचे अर्थमंत्री झाल्याचा पश्चाताप

बातम्यांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, पाएंदा यांची आई 2020 मध्ये कोरोनामुळे मृत पावली. यानंतर लवकरच त्यांना अफगाणिस्तानचे अर्थमंत्री बनवण्यात आले. मात्र, आपण मंत्री झालो, याची त्यांना आजही खंत आहे. ‘आम्ही खूप वेडेपणा पाहिला आहे आणि त्यात आम्ही अपयशी ठरलो. त्या अपयशाचा मीही एक भाग होतो. जेव्हा तुम्ही लोकांची दुर्दशा पाहता तेव्हा ते खूप अवघड असते आणि तुम्हाला जबाबदारीची जाणीव होऊ लागते.

- Advertisement -

अमेरिकेलाही धरले जबाबदार

अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीसाठी पाएंदा अमेरिकेला जबाबदार धरतात. यावर ते म्हणाले की, अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये सुधारणा करण्याची इच्छा नाही, परंतु अमेरिका लोकशाही आणि मानवी हक्कांच्या आश्वासनापासून मागे गेली आहे. यामागे काही चांगली विचारसरणी असू शकते, पण जे झाले आहे, कदाचित अमेरिकेला असा निकाल नको होता.

तालिबानने ताबा मिळवण्याच्या 1 आठवड्यापूर्वी सोडला देश

तालिबानने अलीकडेच अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानातून सर्व सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे तालिबानचे मनोबल वाढले. अफगाण लष्कर आणि तत्कालीन सरकार तालिबानचा सामना करण्यात अपयशी ठरले. तालिबानने राजधानी काबूलचा ताबा घेण्याच्या एक आठवडा आधी, पाएंदा यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते अमेरिकेत गेले. तालिबानने सत्ता हाती घेण्याआधीच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी अहमदझाई यांच्याशी पाएंदाचे संबंध बिघडले होते. यानंतर पाएंदा गनी आपल्याला अटक करेल याने घाबरले होते.


Qatar Airways : दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या विमानाची पाकिस्तानमध्ये Emergency Landing

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -