घरदेश-विदेशमाजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचे निधन

माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचे निधन

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन डी तिवारी यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झआले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. एन डी तिवारी यांचा आज जन्मदिवस होता आणि आजच्या दिवशीच त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

दिर्घ आजाराने एन डी तिवारींचे निधन

एन डी तिवारी यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे २० सप्टेंबरला मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एन जी तिवारी दिर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या वर्षभरापासून ते झोपूनच होते. त्यांना ब्रेन हेमरेज झाले होते तसंच त्यांची किडनी देखील फेल झाली होती. एन डी तिवारी तीन वेळा यूपी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. तसंच त्यांनी केंद्राचे मंत्री पद देखील भूषवले होते. १९७६ साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते.

एन डी तिवारी आदर्श व्यक्तिमत्व होते

एन डी तिवारी हे काँग्रेसमध्ये एक ज्येष्ठ नेते आणि आदर्श व्यक्तिमत्व होते. आपल्या संपूर्ण कारकिर्दी दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पद संभाळली आहेत. उत्तराखंडमध्ये पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे एन डी तिवारी हे एकमेव मुख्यमंत्री होते. एन डी तिवारीनंतर आतापर्यंत उत्तराखंडमध्ये एकही मुख्यमंत्र्याने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही. १९९० मध्ये ते पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. तेव्हा ८०० मतांनी ते निवडणुक हारले होते. त्यानंतर पी व्ही नरसिंह राव यांना पंतप्रधान बनवले गेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -