घरक्राइमधक्कादायक! अमेरिकेत अपहरण केलेल्या चार भारतीयांची हत्या

धक्कादायक! अमेरिकेत अपहरण केलेल्या चार भारतीयांची हत्या

Subscribe

अमेरिकेत अपहरण केलेल्या चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कॅलिफोर्नियाच्या शेरीफने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

अमेरिकेत अपहरण केलेल्या चार भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कॅलिफोर्नियाच्या शेरीफने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांमध्ये एक जोडपे आणि त्यांची आठ वर्षांची मुलगी आणि मुलीच्या काकाचा समावेश आहे. (four indians kidnapped in america found dead)

मिळालेल्या माहितीनुसार, जसदीप सिंग (36), त्यांची पत्नी जसलीन कौर (27), त्यांची आठ महिन्यांची मुलगी आरुही आणि जसदीपचा भाऊ अमनदीप सिंग (39) यांचे अपहरण करण्यात आले होते. या चौघांची अपहरणानंतर अपहरणकर्त्याने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या चोघांच्या हत्येनंतर पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता त्यांचे मृतदेह एका बागेत सापडले.

- Advertisement -

अपहरण प्रकरणी बुधवारी अमेरिकन पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. तो स्वतःही गंभीर अवस्थेत सापडला होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. पोलिसांकडे अद्याप जास्त माहिती नाही, परंतु तपासात त्यांना असे आढळले की, या चौघांना त्यांच्या इच्छेविरुद्ध साउथ स्ट्रीट 59 च्या 800 ब्लॉकमधून नेण्यात आले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, संशयिताचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असून, अनेकांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, संशयित किंवा पीडित व्यक्तींशी संपर्क करू नका आणि दिसल्यास ताबडतोब 911 वर कॉल करा, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

कॅलिफोर्नियातील मर्सिड काउंटीमध्ये सोमवारी या कुटुंबियांचे अपहरण करण्यात आले. शेरीफच्या पोलिसांनी अपहरणकर्ता मानलेल्या माणसाचे दोन फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्याने संशयिताची ओळख पटवून सांगितले की, त्याने मास्क घातला असून हुडी घातली होती.


हेही वाचा – वाघ तो वाघच, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून मनसेने केले राज ठाकरेंचे कौतुक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -