IND vs SA: लखनऊमध्ये रंगणार पहिला वनडे सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला वनडे सामना आज खेळवला जाणार आहे.

Indian Cricket Team

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला वनडे सामना आज खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. (India Vs South Africa 1st ODI Cricket Match Will Be Played In Lucknow Today)

भारतीय संघाला १२ वर्षांनंतर त्यांच्या भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकायची आहे. शिवाय, या वर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यापूर्वी म्हणजेच 2010 मध्ये भारताने 2-1 अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा, विराट, ए राहुल यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या समावेश नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना आपली पात्रता सिद्ध करण्याची ही संधी असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ बुधवारी लखनऊला पोहोचला. मात्र, दिवसभर पावसामुळे सराव सत्रात एकाही संघाने सहभाग घेतला नाही.

लखनऊ वनडे सामन्यात भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादव गोलंदाजी विभागात ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो, जो दीर्घकाळापासून संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

कर्णधार धवनसह शुभमन गिल डावाची सुरुवात करू शकतो. मधल्या फळीत श्रेयस, सॅमसन, शार्दुल आणि इशान किशन यांना त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. रजत पाटीदार आणि गोलंदाज मुकेश यांना आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लखनऊमध्ये दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे पहिल्या सामन्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

भारतीय संभाव्य 11 खेळाडू :

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार/राहुल त्रिपाठी, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद. सिराज, दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका संभाव्य 11 खेळाडू :

टेम्बा बावुमा (कर्णधार), यानेमन मलान, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन/अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, केशव महाराज, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, तबरीझ शम्सी.


हेही वाचा – लेटमार्क ठरलं शिमरॉन हेटमायरच्या वेस्ट इंडिया संघातून बाहेर जाण्याचे कारण; वाचा नेमकं काय घडलं?