घरमनोरंजनआमीर खानचा 'लाल सिंह चड्ढा' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

आमीर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

Subscribe

सूत्रांच्या माहितीनुसार असं सांगितलं जात होतं की, हा चित्रपट पुढील 6 महिन्यांमध्ये प्रदर्शित होईल. मात्र, आता हा चित्रपट 2 महिन्यांमध्येच ओटीटीवर प्रदर्शित केला जात आहे.

बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा बहुचर्चित ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटासोबतच 11 ऑगस्ट
रोजी प्रदर्शित झाला होता. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून आमीर खानने चार वर्षानंतर एन्ट्री केली. त्यामुळे हा चित्रपट त्याचे चाहते नक्कीच पाहतील अशी आशा आमीर खानला होती. मात्र, प्रत्यक्षात हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा पसंत आला नाही. तसेच बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने फारसा गल्ला जमावलेला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार असं सांगितलं जात होतं की, हा चित्रपट पुढील 6 महिन्यांमध्ये प्रदर्शित होईल. मात्र, आता हा चित्रपट 2 महिन्यांमध्येच ओटीटीवर प्रदर्शित केला जात आहे.

- Advertisement -

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘लाल सिंह चड्ढा’

आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतले आहेत. नेटफ्लिक्सने स्वतः याबाबत माहिती सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यामातून आमीर खानच्या चाहत्यांना दिली होती. नेटफ्लिक्स ने ट्वीट करत लिहिलंय की, ‘तुमचे पॉपकॉर्न आणि गोलगप्पे तयार ठेवा कारण, ‘लाल सिंह चड्ढा’ आता प्रदर्शित झाला आहे. जर तुम्ही आमीर खान आणि करीना कपूरते चाहते असाल आणि कोणत्याही कारणाने तुम्हाला ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट पाहायला मिळाला नसेल तर घाबरू नका कारण आता ‘लाल सिंह चड्ढा’ तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

- Advertisement -

‘लाल सिंह चड्ढा’ ची बॉक्स ऑफिसवरील कमाई
आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर मागील काही दिवसांपूर्वी अनेक बहिष्कारांच्या मागण्या केल्या जात होत्या. 400 कोटी कमावणारा आमीर खानच्या या चित्रपटाने केवळ 60 कोटीपर्यंतचीच कमाई केली. या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यांच्याव्यतिरिक्त नागा चैतन्य आणि मोना सिंह यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली होती.


हेही वाचा :

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘गोदावरी’ चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -