घरअर्थजगतअंबानींची वचनपूर्ती; रिलायन्स समूह झाला कर्जमुक्त

अंबानींची वचनपूर्ती; रिलायन्स समूह झाला कर्जमुक्त

Subscribe

रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याने समभागधारकांना दिलेलं कंपनीला कर्जमुक्त करण्याचे वचन पुर्ण केलं.

गेल्या काही दिवसांपासून परकीय गुंतवणुकीचे रोज नवनवे रेकॉर्ड करणाऱ्या रिलायन्स समूहाने मार्च २०२१ पूर्वी कर्जमुक्तीचे लक्ष्य गाठले आहे. अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. गेल्या ५८ दिवसांत कंपनीने १ लाख ६८ हजार ८१८ कोटी रुपये जमा केले आहेत. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपल्या व्यावसायिक कौशल्याने हे ध्येय पूर्ण केलं आहे. समभागधारकांना दिलेलं कंपनीला कर्जमुक्त करण्याचे वचन पुर्ण केल्याने मला आनंद होत असल्याचं मुकेश अंबानी म्हणाले.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूह कर्जमुक्त झाल्याचं शुक्रवारी जाहीर करताना म्हणाले, “भागधारकांना दिलेलं आश्वासन पूर्ण झाल्याची घोषणा करून मला आनंद झाला.” आम्ही आमच्या नियोजित ३१ मार्च २०२१ पूर्वी हे वचन पूर्ण केलं आहे. या बातमीनंतर रिलायन्स शेअर्सने शुक्रवारी एनएसई वर १६८४ रुपयांनी नवीन उच्चांक गाठला आहे. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही जोरदार वाढ झाली आहे. आरआयएलची मार्केट कॅप १०.६४ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापनदिन! उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार


रिलायन्स समूहाने गुरुवारी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ११ व्या गुंतवणूकीची घोषणा केली. मागील ९ आठवड्यांतील सलग १० गुंतवणूकदारांनंतर सौदी अरेबियाची सार्वभौम संपत्ती निधि पीआयएफ कंपनी जियो प्लॅटफॉर्ममध्ये २.३२ टक्के भागिदारीसाठी ११,३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनीने गेल्या २८ दिवसांत जियो प्लॅटफॉर्ममध्ये परकीय गुंतवणूकीद्वारे ११५,६९३.९५ कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर राइट्स इश्यूद्वारे ५३,१२४.२० कोटी रुपये उभे केले आहेत.

- Advertisement -

पेट्रो-रिटेल जेव्ही मधील बीपीच्या हिस्सेदारी विक्रीमुळे कंपनीचा एकूण निधी वाढून १.७५ लाख कोटी रुपये झाला आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत कंपनीचे १ लाख ६१ हजार ०३५ कोटी रुपयांचं कर्ज होतं, असंही निवेदनात म्हटलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीने जिओ प्लॅटफॉर्ममधील २४.७ टक्के विक्रीतून ११५,६९३.९५ कोटी रुपये जमा केले आहेत. १२ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी १८ महिन्यात रिलायन्सला कर्जमुक्त करण्याचे उद्धीष्ट जाहीर केले होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -