घरदेश-विदेशफेसबुकमध्ये 20 हजार नोकऱ्यांची बंपर वॅकन्सी; पगार चार लाख

फेसबुकमध्ये 20 हजार नोकऱ्यांची बंपर वॅकन्सी; पगार चार लाख

Subscribe

जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फेसबुकमध्ये देशभरातून २० हजार कंटेन्ट मॉडरेटर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे.

फेसबुकने काही दिवसांपूर्वी अश्लिल, शिविगाळ तसंच दहशतवादाशी संबंधित कंटेंट हटवण्यासाठी देशभरातून २० हजार कंटेन्ट मॉडरेटर्सची नियुक्ती करणार असल्याची घोषणा केली होती. कंटेन्ट मॉडरेटर्सच्या नियुक्तीसाठी फेसबुकने पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. भारतातील हजारो पदवीधर उमेदवारांनी फेसबुकमध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

प्रादेशिक भाषांमध्ये केली जातेय नियुक्ती

कंटेट मॉडरेटर्सच्या नियुक्ती करण्यासाठी बीजनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) कंपनी जेनपॅक्टला कंत्राट दिले आहे. या कंपनीकडून पंजाबी, मराठी, तमिळ, कन्नड, उडिया और नेपाळी या भाषांसह आणखी काही भागातील प्रादेशिक भाषांसाठी कंटेंट मॉडरेटर्स घेणार आहे. जेनपॅक्टकडून ऑनलाईन एम्पलॉयमेंटच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत. या पदासाठी ऑगस्टमध्ये मुलाखतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

असे असणार कंटेन्ट मॉडरेटर्सचे काम

फेसबुकवर यूजर्सकडून टाकलेला कंटेन्ट आणि व्हिडिओला मॉनिटर आणि मॉडरेट करण्याचे काम हे फेसबुक मॉडरेटर करतील. लैंगिक शोषण, दहशतवाद, लहान मुलांचं लैंगिक शोषण, आत्महत्येचा लाईव्ह व्हिडिओ आणि हिंसात्मक कंटेटवर कारवाई आणि असा कंटेट डिलीट किंवा ब्लॉक करण्याचं काम फेसबूक मॉडरेटरला करावं लागणार आहे. फेसबुककडून नियुक्त करण्यात येणाऱ्या फेसबुक मॉनिटर्सला २.५ लाख ते ४ लाख रुपये वर्षाला पॅकेज मिळणार आहे.

हैद्राबाद येथे होणार नियुक्ती

भारतामध्ये फेसबुकचे हैद्राबाद येथे ऑफिस आहे. फेसबुककडून हैद्राबाद येथेच कंटेन्ट मॉडरेटर्सची नियुक्ती केली जाणार आहे. फेसबुककडून देखील कंटेट मॉडरेटर्सची नियुक्ती केली जाते. ५० पेक्षा अधिक भाषांमधील फेसबुक कंटेन्टला मॉनिटर करण्यासाठी फेसबुक आऊटसोर्सिंग करत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -